नाथांच्या जाण्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही - बच्चू कडू

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीला एकनाथ भेटल्यामुळे राष्ट्रवादीला चांगले दिवस येतील, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय.

नाथांच्या जाण्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही - बच्चू कडू

अमरावती : गेल्या अनेक दिवसांपासून भाजपमध्ये नाराज असलेल्या एकनाथ खडसेंनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजप सोडता सोडता फडणवीस यांच्या वागणुकीमुळे असं करावं लागत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. त्यानंतर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एकनाथ खडसेंच्या जाण्यानं भाजपचं मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं आहे. खरं तर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजप उत्तर महाराष्ट्रात अनाथ झाल्याशिवाय राहणार नाही. राष्ट्रवादीला एकनाथ खडसे भेटल्यामुळे चांगले दिवस येतील, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलंय. तसेच एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याबद्दल शुभेच्छा देखील दिल्या आहेत. (Bacchu Kadu well wishesh on eknath khadse)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांनी काल राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर उपस्थितांना शरद पवारांनी संबोधित केले. नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी माझ्याशीही चर्चा केली. त्यावेळी त्यांनी एका शब्दांनीही माझ्याकडे कोणत्याही पदाची अपेक्षा व्यक्त केली नाही.

40 वर्षे भाजपमध्ये काम केलं. आता दुर्दैवानं हा निर्णय घ्यावा लागतोय. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी पडेल ते काम करण्याची माझी इच्छा आहे, असं सांगतानाच जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वात पक्षाचं काम चांगलं सुरू आहे. आता त्यांना नाथाभाऊंसारख्या ज्येष्ठ नेत्याची साथ मिळेल. संघटना आणि प्रशासनाचा अनुभव असलेल्या अशा ज्येष्ठ व्यक्तिमत्वाची जयंतरावांना साथ मिळालीय. त्यामुळे सामान्य माणसाला अडचणीतून बाहेर काढता येईल, असं पवार म्हणाले होते.

खडसे येत असल्याने काही लोकांनी त्यांना कोणतं मंत्रिपद मिळणार? त्यांच्यासाठी कुणाला तरी घरी बसावे लागेल, अशा बातम्या सुरू केल्या. त्यात काही तथ्य नाही. आहे ते सर्व त्याच ठिकाणी राहतील. त्यात कोणताही बदल होणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. पवारांच्या या दोन्ही विधानामुळे खडसे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचं स्पष्ट होत असून त्यांच्यावर पक्ष वाढीची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत.

एकनाथ खडसे यांची राजकीय कारकीर्द

1980 मध्ये खडसे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते.

एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, 1987 मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (1989 – 2019) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.

संबंधित बातम्या:

नाथाभाऊ काय चीज आहे हे महाराष्ट्राला दाखवून देऊ; शरद पवार यांचा सूचक इशारा

जयंतराव, काही दिवस थांबा, कुणी किती भूखंड घेतलेत सांगतो : एकनाथ खडसे

दिल्लीतल्या वरिष्ठांनी सांगितलं तुम्हाला पक्षात संधी नाही, तुम्ही राष्ट्रवादीत जा; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *