एकनाथ खडसेंनी भाजपचा राजीनामा दिल्याच्या चर्चा, चंद्रकांत पाटील म्हणतात...

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फोनवरून टीव्ही 9कडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

एकनाथ खडसेंनी भाजपचा राजीनामा दिल्याच्या चर्चा, चंद्रकांत पाटील म्हणतात...

मुंबईः गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्याच्या बातम्यासुद्धा चर्चिल्या जात आहेत. परंतु एकनाथ खडसेंनी अद्याप राजीनामा दिलेला नसल्याची माहिती मिळाली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फोनवरून टीव्ही 9कडे प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (chandrakant patil on eknath khadse)

राजीनामा प्रदेशाध्यक्षांकडे पाठवायचा असतो, माझ्यापर्यंत त्यांचा राजीनामा अद्याप आलेला नाही, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटलांनी स्पष्ट केलं आहे. एकनाथ खडसे असं काही करणार नाहीत, याबद्दल मी ठाम असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला आहे. एकनाथ खडसे 21 तारखेला मुलीसोबत मुंबईत येणार असून, ते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. तसेच मी अद्यापपर्यंत भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही, असंही एकनाथ खडसेंनी स्पष्ट केलं आहे.

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र विजयादशमी किंवा त्याआधी खडसे सीमोल्लंघन करत मोठा भाजपला धक्का देतील, असं बोललं जातं. एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे रावेर मतदारसंघातून खासदार आहेत. दुसऱ्यांदा खासदारपद मिळालेल्या रक्षा खडसे यांच्याकडे भाजपने महाराष्ट्र कार्यकारिणीत मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. दुसऱ्या टर्ममध्ये केवळ दीड वर्ष झाल्याने रक्षा खडसे भाजपमध्येच राहतील आणि उर्वरित चार वर्ष पूर्ण करतील, अशी अटकळ बांधली जात आहे.

एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे-खेवलकर आणि खडसेंच्या संपर्कातील दहा ते पंधरा आमदार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील, असं खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंना डावलून भाजपने त्यांच्या कन्येला तिकीट दिलं होतं. मात्र राष्ट्रवादीपुरस्कृत उमेदवाराकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता खडसे बापलेकीने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्यास उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना ठाकरे सरकारमध्ये थेट कृषिमंत्रिपद देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सध्या कृषिमंत्रिपद हे शिवसेनेकडे असून, सेनेचे दादा भुसे हे कृषिमंत्री आहेत. खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ठाकरे सरकारमध्ये खात्यांची अदलाबदल करण्यात येण्याची शक्यता असून, शिवसेनेकडे असलेले कृषिमंत्रिपद राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एक वजनदार राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांचं राजकीय पुनर्वसन कसं केलं जाणार? ठाकरे सरकारमध्ये खडसेंना स्थान मिळणार का? आणि त्यांना कोणतं मोठं खातं मिळणार? असे प्रश्न आता विचारले जाऊ लागलेत.

गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजप वाढवणाऱ्या एकनाथ खडसेंसारख्या बड्या नेत्याला राष्ट्रवादीत घेताना मोठी जबाबदारी द्यावी लागणार हे निश्चित आहे. उत्तर महाराष्ट्रात पक्ष विस्तार आणि भाजपला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीला खडसेंसारख्या नेत्याची गरज आहे. त्यामुळं शरद पवार खडसेंना कृषीमंत्रिपदी देण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारमध्ये एकनाथ खडसेंचं स्थान जवळपास निश्चित, कृषिमंत्रीपद मिळण्याची चिन्हं

एखादा नेता पक्षात आल्यावर फायदा होता, तसा गेल्यावर तोटा होतो, पंकजा मुंडेंचं खडसेंवर भाष्य

एकनाथ खडसेंचा संभाव्य राष्ट्रवादी प्रवेश, सुप्रिया सुळेंनी चेंडू ‘या’ नेत्याकडे टोलवला

(chandrakant patil on eknath khadse)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *