गडचिरोलीत 777 कोटींचे रस्ते-पूल, एकनाथ शिंदेंच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीत 777 कोटींच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या रस्ते आणि पुलांचे लोकार्पण-भूमिपूजन केले

गडचिरोलीत 777 कोटींचे रस्ते-पूल, एकनाथ शिंदेंच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण

गडचिरोली : महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्यात 777 कोटींच्या गुंतवणुकीतून उभारलेल्या रस्ते आणि पुलांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली व्हर्च्युअल सोहळ्याच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. (Eknath Shinde Virtually Inaugurated Roads and Bridges in Gadchiroli)

“गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादाचा कणा मोडण्यासाठी ठाकरे सरकारने विकासावर भर दिला असून विकासाची फळे स्थानिक जनतेला मिळू लागल्यावर आपसूक नक्षलवादाचा प्रभाव कमी होईल” असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात तब्बल 777 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून तयार झालेल्या आणि होत असलेल्या रस्ते व पुलांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज (रविवार 30 ऑगस्ट) व्हर्च्युअल सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आले. दिल्लीहून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला.

कोणकोणत्या विकास कामांचे लोकार्पण :

1. प्राणहिती नदीवरील निजामाबाद सिरोंचा असरअल्ली जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग 63 वरील पूल कामाची किंमत 168 कोटी

2. इंद्रावती नदीवरील पातागुडम जवळील 248 कोटींचा पूल

3. लंकाशेनू येथील बेजूरपल्ली परसेवाडा देवलमारी अहेरी यांना जोडणारा 7.71 कोटींचा पूल

4. बेजूरपल्ली परसेवाडा देवलमारी अहेरी या राज्य महामार्गाची दुरुस्ती 25.81 कोटी

5. गारंजी पुस्तोला रस्त्याची 35.62 कोटी रुपयांची दुरुस्ती

कोणकोणत्या विकास कामांचे भूमिपूजन

1. पेरीमिली नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल – 43.23 कोटी

2. बांडीया नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल 72.59 कोटी

3. पर्लकोटा नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल 77.98 कोटी

(Eknath Shinde Virtually Inaugurated Roads and Bridges in Gadchiroli)

4. वैनगंगा नदीवरील तेलंगणा सीमा ते कोरपना, गडचांदूर, राजूरा, बाम्नी, आष्टी जोडणारा पूल 98.83 कोटी

तब्बल 777 कोटी रुपये किंमतीच्या या प्रकल्पांमुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. अहेरी, भामरागड, लाहेरी आदी दुर्गम भागांमधील या रस्ते व पुलांमुळे पावसात या परिसराचा संपर्क टिकून राहील, वाहतूक अबाधित राहील, तसेच आरोग्य व शिक्षण व्यवस्थाही अधिक बळकट करता येईल, असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला.

गडचिरोलीला विकासाच्या मुख्य धारेत आणून नक्षलवादाचा कणा मोडणे, याला सरकारचे प्राधान्य आहे, असे यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले. केंद्रीय राज्यमंत्री व्ही. के. सिंग, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आदी मान्यवरही यावेळी उपस्थित होते.

(Eknath Shinde Virtually Inaugurated Roads and Bridges in Gadchiroli)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *