निवडणूक आयोगाकडून EVM आणि VVPAT मधील मतांची तपासणी, डेटा जुळला की नाही जाणून घ्या

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत विरोधकांनी ईव्हीएमबाबत केलेल्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने 288 विधानसभा मतदारसंघातील 1440 स्लिपची तपासणी केली गेली. यामध्ये कोणतीही विसंगती आढळून आली नाही. महाराष्ट्रात VVPAT डेटामध्ये तफावत आढळली की नाही जाणून घ्या काय म्हणाले निवडणूक आयोग.

निवडणूक आयोगाकडून EVM आणि VVPAT मधील मतांची तपासणी, डेटा जुळला की नाही जाणून घ्या
Follow us
| Updated on: Dec 10, 2024 | 8:00 PM

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं. तर महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीला याआधी कधीही मिळालं नव्हत्या इतक्या जागा मिळाल्या. यावर मात्र महाविकासआघाडीने संयश व्यक्त केला होता. महाविकासआघाडीच्या पराभूत उमेदवारांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करत त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा विचार केला आहे. ईव्हीएमवर वेगवेगळे आरोप होत असतानाच निवडणूक आयोगाने महत्त्वाची माहिती दिली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीसह एकूण मतांचा डेटा जुळण्यात आला असून यात कुठलीही त्रुटी आढळली नसल्याचं निवडणूक आयोगाने म्हटले आहे. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांनी केलेल्या ट्विटनुसार, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील (AC) यादृच्छिकपणे निवडलेल्या 5 VVPAT स्लिप्स आणि EVM मधील कंट्रोल युनिटमध्ये नोंदवलेल्या गेलेल्या मतांसोबत जुळवल्या गेल्या.

288 विधानसभा मतदारसंघातील 1440 VVPAT स्लिपची तपासणी करण्यात आल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. यादरम्यान त्यांना कोणतीही विसंगती आढळून आलेली नाही. महाराष्ट्रात VVPAT डेटामध्ये कोणतीही तफावत नसल्याचा दावा निवडणूक आयोगाने केला आहे. त्यामुळे राजकीय पक्षांनी केलेल्या तक्रारी आणि दावे खरे नाहीत असं ही त्यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या महाविकास आघाडी (MVA)ने ईव्हीएममध्ये अनियमितता झाल्याचा आरोप केला होता. निवडणूक प्रक्रियेत ईव्हीएमची सत्यता सिद्ध करण्यासाठी, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, महाराष्ट्रातील जिल्हा प्रशासनाने नांदेडमधील 75 व्हीव्हीपीएटी मशीनची पडताळणी करुन मतांची जुळवणी केली. मात्र, दोघांच्या डेटामध्ये कोणताही तफावत आढळली नाही.

महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसने जिंकलीये. परंतू त्याच जिल्ह्यातील ६ विधानसभा जागांवर काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागलाय. काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहले असून ईव्हीएममध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप केलाय. उमेदवारांचे प्रतिनिधी व निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान केंद्रांची निवड करण्यात आली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 व्हीव्हीपीएटी मशीनच्या स्लिप्सची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ईव्हीएममध्ये टाकलेल्या मतांशी ते जुळवण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत म्हणाले की, जिल्ह्यातील 75 केंद्र, 30 लोकसभा आणि 45 विधानसभा जागांच्या मतमोजणीत कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही.

जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.