जिवंत मतदाराला मृत दाखवलं, मतदारांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली!

बुलडाणा : मलकापूर येथील मतदान केंद्रावर जिवंत मतदारांना मृत दाखवल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे संतापलेल्या मतदारांनी मृत दाखवलेल्या मतदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत या घटनेचा निषेध केला. ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा मतदान केंद्रावरुन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर नेण्यात आली. त्यामुळे संपूर्ण शहरात ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा चर्चेची ठरली असून प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. तिसऱ्या टप्प्याचे मतदान काल (23 एप्रिल) …

जिवंत मतदाराला मृत दाखवलं, मतदारांनी प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली!

बुलडाणा : मलकापूर येथील मतदान केंद्रावर जिवंत मतदारांना मृत दाखवल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे संतापलेल्या मतदारांनी मृत दाखवलेल्या मतदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत या घटनेचा निषेध केला. ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा मतदान केंद्रावरुन उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर नेण्यात आली. त्यामुळे संपूर्ण शहरात ही प्रतिकात्मक अंत्ययात्रा चर्चेची ठरली असून प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.

तिसऱ्या टप्प्याचे मतदान काल (23 एप्रिल) महाराष्ट्रातील 14 जागांवर पार पडले. रावेर मतदारसंघातील मलकापूरमधील बुथ क्रमांक 166 वर रोहिदास नगर येथील हा प्रकार आहे. या मतदान केंद्रावर मतदार क्रमांक 521 श्रीकृष्ण संपत शेकोकार, मतदार क्रं. 640 मोहनसिंग चिंधू गणबास, दत्तनगर मधील मतदार क्रमांक 443 सौ.रजनी दिनकर जोशी यांसह जवळपास पन्नास जिवंत मतदारांना चक्क मृत दाखवले आहे. काही वेळातच ही घटना संपूर्ण शहरात चर्चेची ठरली.

या घटने संदर्भात सहाय्यक निवडणूक अधिकारी विंचनकर यांना संपर्क केला असता, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी बुथ क्रमांक 166 वरुन सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयावर डफडे वाजवून प्रतिकात्म अंत्ययात्रा काढली.

प्रतिकात्मक अंत्ययात्रा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकताच पोलीस अधिकारी गिरीश बोबडे, शहर पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड पोलीस ताफ्यासह दाखल झाले. नगराध्यक्ष अँड हरीश रावळ यांनी जिवंत असलेल्या व्यक्तीला निवडणूक यादीतील नाव रद्द केल्याने तो मतदानापासून वंचित राहिला. यामुळे मतदार याद्या अद्यावत करुन ‘त्या’ बुथवर पुर्नमतदान घेण्याची मागणी केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *