'ऑपरेशन भारतवर्ष'चा दणका, तडसांना निवडणूक आयोगाची नोटीस

वर्धा : टीव्ही 9 भारतवर्ष या हिंदी वृत्तवाहिनीने ‘ऑपरेशन भारतवर्ष’ (Operation Bharatvarsh) अंतर्गत केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजप खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश झाला आहे. ‘ऑपरेशन भारतवर्ष’च्या स्टिंगमध्ये रामदास तडस यांचे बिंग फुटल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगानेही नोटीस पाठवली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी 25 कोटी रुपये खर्च करणार आणि डमी उमेदवारासाठी 4 कोटी रुपये खर्च करणार, या दोन …

operation bharatvarsh, ‘ऑपरेशन भारतवर्ष’चा दणका, तडसांना निवडणूक आयोगाची नोटीस

वर्धा : टीव्ही 9 भारतवर्ष या हिंदी वृत्तवाहिनीने ‘ऑपरेशन भारतवर्ष’ (Operation Bharatvarsh) अंतर्गत केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये भाजप खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश झाला आहे. ‘ऑपरेशन भारतवर्ष’च्या स्टिंगमध्ये रामदास तडस यांचे बिंग फुटल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगानेही नोटीस पाठवली आहे. यंदाच्या निवडणुकीसाठी 25 कोटी रुपये खर्च करणार आणि डमी उमेदवारासाठी 4 कोटी रुपये खर्च करणार, या दोन दाव्यांबाबत येत्या 24 तासात निवडणूक आयोगाने भाजप खासदार रामदास तडस यांच्याकडून स्पष्टीकरण मागवलं आहे.

भाजप खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश :

  • 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी 10 कोटी रुपये मी खर्च केले, यावेळी 25 कोटी रुपये खर्च करेन – रामदास तडस
  • डमी उमेदवार उभे करण्यासाठी 4-4 कोटी रुपये खर्च केले – रामदास तडस
  • पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारण्यासाठी मी तयार – रामदास तडस
  • निवडणुकीसाठी 5 कोटी मिळाले – रामदास तडस
  • पूर्ण निवडणूक कॅशने लढवल्या जातात – रामदास तडस
  • नोटाबंदीचा काळ्या पैशावर कसलाही फरक पडला नाही – रामदास तडस

रामदास तडस कोण आहेत?

रामदास तडस हे भाजपचे वर्धा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2009 साली रामदास तडस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 साली वर्धा लोकसभा निवडणूक तडस यांनी भाजपमधून लढवली आणि विजयी झाले. वर्ध्यातील देवळी नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी तीनवेळा काम पाहिले. त्यानंतर 2007 ते 2009 या काळात परिवहन महामंडळात तडस संचालक होते. 2014 साली लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर, त्यांची केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.

VIDEO : खासदार रामदास तडस यांचा पर्दाफाश, पाहा स्टिंग ऑपरेशन

 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *