निवडणूक अधिकारी ईव्हीएमसह रात्रभर पुराच्या पाण्यात…नंतर अशी झाली सुटका..

नाशिक जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडत असतांना जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने निवडणूक प्रक्रियेला फटका बसला आहे.

निवडणूक अधिकारी ईव्हीएमसह रात्रभर पुराच्या पाण्यात...नंतर अशी झाली सुटका..
Image Credit source: TV9 Network
किरण ताजणे

|

Sep 19, 2022 | 12:28 PM

नाशिक : राज्यातील ग्रामपंचयातीचा निकाल (Grampacnchayat Election) आज सायंकाळ पर्यंत हाती येणार आहे. ठिकठिकाणी मतमोजणीला सुरुवात देखील झाली आहे. अनेक जिल्ह्यातील गावांचे निकाल देखील समोर येत आहेत. याचवेळी नाशिक जिल्ह्यातील (Nashik)  निवडणूक अधिकारी पथकाचे कौतुक होऊ लागलेय. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात काल दिवसभर पावसाची संततधार सुरू असल्याने पार नदीला पूर येऊन पुलावरून पाणी गेले होते. यामुळे देहरे गावातील प्रभाग 3 चे निवडणूक पथक सायंकाळी ईव्हीएम मशीनसह अडकून पडले होते. प्रशासनाच्या निवडणूक पथकातील 5 कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम सुरक्षित रहावे यासाठी देहरे मतदान केंद्रावरच रात्र जागून काढली. ईव्हीएम (EVM) अडकल्याने प्रशासकीय यंत्रणा चिंतेत होत्या मात्र सकाळी पुराचे पाणी थोड्या प्रमाणात ओसरताच पथक सुखरूपपणे ईव्हीएम मशीन घेऊन मतमोजणी केंद्रावर पोहोचले.

निवडणूक पथकातील अधिकाऱ्यांनी चोकपणे कर्तव्य बजावल्याने तहसिलदार पंकज पवारांच्या हस्ते या पथकाचा यावेळी सत्कार करण्यात आला.

राज्यातील ग्रामपंचायतीचे नुकतेच मतदान पार पडल्यानंतर आज मतमोजणी होत असून निकाल जाहीर होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडत असतांना जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत असल्याने निवडणूक प्रक्रियेला फटका बसला आहे.

दिंडोरी तालुक्यातील पार नदीला पूर आल्याने देहेरे गावातील एक निवडणूकीच्या अधिकाऱ्यांचे पथक अडकून पडले होते.

अडकून पडलेल्या अधिकाऱ्यांनी मात्र ईव्हीएमला कुठलाही धोका पोहचणार नाही याची काळजी घेत ईव्हीएम सुरक्षित ठेवल्याने मोठे संकट टळल्याचे बोलले जात आहे.

कदाचित ईव्हीएम पाण्यात वाहून गेले असते किंवा पाण्यात बुडाले असते तर गावचा संपूर्ण निकाल हा प्रलंबित ठेवावा लागला असता.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें