'महावितरण'चा ग्राहकांना शॉक, वीजदरवाढीचा प्रस्ताव

राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या 'महावितरण' कंपनीने 5927 कोटी रुपये वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर सर्वसामान्यांना वीजदरवाढीची झळ सोसावी लागणार आहे.

electricity bill will be rise, ‘महावितरण’चा ग्राहकांना शॉक, वीजदरवाढीचा प्रस्ताव

मुंबई : देशावर सध्या आर्थिक मंदीचे सावट आहे. याशिवाय महागाईदेखील वाढली आहे (electricity bill will be rise). जीवनाश्यक वस्तू दिवसेंदिवस महाग होत चालल्या आहेत. यामध्ये आता वीज दरवाढीचाही समावेश होणार आहे. राज्यभरात वीज पुरवठा करणाऱ्या ‘महावितरण’ या कंपनीने वीज नियामक आयोगाकडे दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला वीजेसाठी भविष्यात जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

राज्यभरात वीजपुरवठा करणाऱ्या ‘महावितरण’ कंपनीने 5927 कोटी रुपये वीज दरवाढीचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे केला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर सर्वसामान्यांना वीजदरवाढीची झळ सोसावी लागणार आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास एप्रिल 2020 पासून 5.80 टक्क्यांनी वीजदर वाढणार आहे.

दरवाढीचा सर्वाधिक झटका सर्वसामान्यांनाच बसण्याची शक्यता

राज्यात सध्या 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांचा वीजदर हा प्रतियुनिट 3.05 रुपये आहे. हा वीजदर प्रतियुनिट 3.30 रुपयांपर्यंत करण्याचे प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे प्रतियुनिट तब्बल 25 पैशांनी वीज महागणार आहे.

याशिवाय 101 ते 300 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचा वीजदर प्रतियुनिट 6.95 रुपये आहे. हा वीजदर प्रतयुनिट 7.30 रुपयांपर्यंत करण्याचा प्रस्ताव महावितरणने वीज नियामक आयोगकडे ठेवला आहे. हा प्रस्तावही मंजूर झाला तर 101 ते 300 युनिट वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी प्रतियुनिट 35 पैशांनी वीजदर वाढणार आहे.

राज्यात 301 पेक्षा जास्त युनिट वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांचा वीजदर कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे 301 पेक्षा जास्त युनिट वीजेचा वापर करणाऱ्या ग्राहकांना सध्यातरी या वीजवाढीला सामोरे जाता येणार नाही, अशी शक्यता आहे.

महावितरणच्या प्रस्तावात रेल्वे, मेट्रो आणि मोनो यांचादेखील वीजदर 10 टक्क्यांनी वाढवण्याचे नमूद करण्यात आले आहे.

पाच वर्षात टप्प्याटप्याने वाढणार वीजदर

महावितरणने पाच वर्षांच्या दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावानुसार एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 5.80 टक्के वीजदर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत 3.25 टक्के, 2022 ते 2023 दरम्यान 2.93 टक्के, 20203 ते 2024 या कालावधीत 2.61 टक्के आणि 2024 ते 2025 या कालावधीत 2.54 टक्के वीजदर वाढणार आहे.

छोट्या ग्राहकांना फटका बसणार नाही : ऊर्जामंत्री

दरम्यान, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “छोट्या ग्राहकांना वीजदरवाढीचा फटका बसणार नाही. उद्योगपतींकडे असलेली थकीत विजबीलाची रक्कम सक्तीनं वसूल केली जाणार आहे. महावितरणच्या ज्या अधिकाऱ्यांनी थकीत वीजदर वसूली केली नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल”, असे नितीन राऊत म्हणाले. त्याचबरोबर वीजदरवाढीबाबत उद्या म्हणजे 17 जानेवारीला बैठक असल्याची माहिती देखील राऊत यांनी दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *