समाजकार्य जिवंत ठेवण्यासाठी उभारले हमालाच्या नावाने प्रवेशद्वार, ग्रामस्थांनी जमवले तब्बल 15 लाख रुपये

समाजकार्य जिवंत ठेवण्यासाठी उभारले हमालाच्या नावाने प्रवेशद्वार, ग्रामस्थांनी जमवले तब्बल 15 लाख रुपये
प्रवेशद्वार

जुन्नर तालुक्यातील आळे गावात एका हमाली काम करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याच्या नावे एक भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वारासाठी तब्बल 15 लाख रुपये खर्च करण्यात आले.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Jun 30, 2021 | 5:24 PM

पुणे : जुन्नर तालुक्यातील आळे गावात एका हमाली काम करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चात त्याच्या नावे एक भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. या प्रवेशद्वारासाठी ग्रामस्थांनी तब्बल 15 लाख रुपये जमवले आहेत. हा सर्व खर्च ग्रामस्थांनी देणगी गोळा करुन केला. मृत्यू झालेल्या हमालाचे नाव बळवंत कुऱ्हाडे असून त्यांचे समाजकार्य कायमस्वरुपी जिवंत राहावे तसेच त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहाव्यात यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला. (entrance gate made in the name of porter made in Junnar Pune)

लोकांच्या अंत्यविधीचा खर्च स्वत: करायचे 

बळवंत हमाल यांना सर्वत्र बळूबाबा म्हणून ओळखले जायचे. बळूबाबा आळे गावामध्ये हमाली करत असताना जमेल त्या पद्धतीने समाजसेवा करायचे. केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता त्यांनी शेवटपर्यंत सामाजिक भूमिका जपली. तसेच गावात कोणाचा मृत्यू झालाच तर त्याच्या अंत्यविधीचा सर्व खर्च ते स्वत:च्या खिशातून करायचे. कोणत्याही जातीधर्माची व्यक्ती असली तरी त्याच्या अंत्यविधीचा सर्व खर्च ते स्वत: करत.

तसेच मुस्लिम समाजातील अनेक लोकांचे दफन पद्धतीने त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. ज्या लोकांच्या घरी मृत्यू झाला आहे त्या शोकाकुल लोकांना धीर देण्याचे कामसुद्धा ते करत असत. विशेष म्हणजे आपल्या हमालीच्या कमाईतून आलेल्या पैशातून ते दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबांना आर्थिक मदतसुद्धा करायचे.

लहान मुलांमध्ये बळूबाबांची क्रेझ

लहान मुलांमध्ये बळूबाबांची क्रेझ जास्त होती. हा वयोवृद्ध माणूस लहान मुलांमध्ये एका छोट्या मुलासारखा होऊन जायचा. तसेच त्यांच्यात पूर्णपणे मिसळायचा. मात्र, बळूबाबांच्या मृत्यूनंतर आळे गावांमध्ये मध्यंतरीच्या काळात एक शोककळा पसरली होती. बळूबाबांच्या अंत्यविधिच्या वेळी समस्त आळेकर ग्रामस्थांनी 7 ते 8 लाख रुपये देणगीच्या माध्यमातून जमवले होते. त्यात आणखी थोडीफार रक्कम मिसळून समस्त आळेकरवासीयांनी तब्बल 15 लाख रुपये खर्च करुन बळवंत हमाल यांच्या नावाने प्रवेशद्वार उभारले. तसेच प्रवेशद्वाराच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती जपण्याच प्रयत्न केला आहे.

इतर बातम्या :

प्रेम केलं, पण पाच निरापराध कुटुबियांना जमिनीत गाडलं, गुंतागुंतीचं प्रकरण

चार आण्याची कोंबडी अन्…. दीडशे रुपयांच्या पोषण आहारासाठी विद्यार्थ्यांना उघडावे लागणार 1000 रुपयांचे बँक खाते

‘मी मंत्रीपदाची मागणी केलेली नाही, जी जबाबदारी देतील ते पार पाडेन’, नाना पटोलेंकडून स्पष्ट

(entrance gate made in the name of porter made in Junnar Pune)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें