गाठी व्यवसायात महिला बचत गटांची एंट्री, व्यवसायाला नवसंजीवनी; लाखोंची उलाढाल

भंडारा (bhandara) जिल्ह्यात गाठी व्यवसायात चक्क आता महिला बचत गटांची एंट्री (entry) झाली आहे. गाठी व्यावसायिकांप्रमाणे आता बचत गटांमार्फत ही गाठीच्या व्यवसायात लाखोची उलाढाल होत आहे.गाठी व्यवसायामुळे तिथल्या स्थानिकांना एक महिन्याचा रोजगार मिळतो.

गाठी व्यवसायात महिला बचत गटांची एंट्री, व्यवसायाला नवसंजीवनी; लाखोंची उलाढाल
महिला बचत गट गाठी तयार करीत आहे.Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 8:29 AM

भंडारा – भंडारा (bhandara) जिल्ह्यात गाठी व्यवसायात चक्क आता महिला बचत गटांची एंट्री (entry) झाली आहे. गाठी व्यावसायिकांप्रमाणे आता बचत गटांमार्फत ही गाठीच्या व्यवसायात लाखोची उलाढाल होत आहे.गाठी व्यवसायामुळे तिथल्या स्थानिकांना एक महिन्याचा रोजगार मिळतो. हिंदू संस्कृतीत होळीच्या पुजेला एक विशेष महत्त्व आहे. होलीका मातेच्या पुजेसाठी होळीला (holi) गाठीचा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय ही पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्यात गाठीचा व्यवसाय एक महिना चालतो. त्यातून लाखोंची उलाढाल देखील होते. होळीच्या सणामुळे तिथल्या स्थानिकांना एक महिना रोजगार मिळतो. त्या व्यवसायात आता बचत गट उतरला असल्याने व्यवसायाला नवसंजीवनी प्रात्प झाली आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात आजही पिढीजात बांधव साखरेच्या पाकापासून बनविण्यात येणाऱ्या या “गाठीला “अनन्य साधारण महत्व आहे.

भंडारा शहरात “गाठ्या” बनविणारे पिढीजात परिवार

मात्र आता गाठी ह्या व्यवसायात जिल्ह्यातील महिला बचत गट ही उतरल्या आहेत. रंगाचा सण म्हणून होळी हा उत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हाच उत्सव कित्येकांना महीन्याभराचा रोजगार सुद्धा देत असतो. गुलाल बनविणाऱ्यापासून तर पिचकाऱ्या बनविणाऱ्या असंख्य कामगारांचा यात समावेश असतो. मात्र होळी दहनाच्या दिवशी पुरण पोळी सोबतच होळीला गाठ्यांचा नैवेद्य देण्याची प्रथा असून आजही भंडारा शहरात “गाठ्या” बनविणारे पिढीजात परिवार आजच्या घडीला सुद्धा गाठ्यांची निर्मिती पारंपरिक पद्धतीने करीत आहेत. या पिढीजात व्यवसायात आता लक्ष्मी महिला बचत गटांच्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती होते. गाठ्यांच्या विक्रीतून दरवर्षी लाखोची उलाढाल एकट्या भंडारा जिल्ह्यातून होत असते. या गाठ्यांच्या माळा तयार करण्याकरिता मोठ्या प्रमाणात साखरेला वितळवून त्याचा “पाक ” तयार करण्यात येत असतो. तसेच गरम पाक लाकडाच्या बनविलेल्या साच्यात हळुवारपणे टाकून त्याला थंड केला जातो.थंड झाल्यानंतर गाठ्यांच्या माळा अगदी 10 मिनिटात तयार होतात.

महिला बचत गटाना प्रशिक्षण दिल्याने त्यात महिला बचत गट सामिल झाले

भंडारा जिल्ह्यात पिढीजात विणकरांप्रमाणेच गाठ्या बनविणारे कामगार देखील मोठ्या प्रमाणात होते. मात्र बदलत्या काळाप्रमाणे आज त्यांची संख्या कमी झाली आहे. आजचा घडीला गाठ्यांचा व्यवसाय हा भंडारा, तुमसर व पवनी या तीन तालुक्यापर्यंतच सीमित राहिला होता. मात्र जिल्हा परिषदेच्या मार्फत महिला बचत गटाना प्रशिक्षण दिल्याने त्यात महिला बचत गट सामिल झाले आहेत. त्यामुळे संपृष्ठात येत असलेल्या ह्या व्यवसायाला नवसंजीवनी मिळाली आहे.

मनसेचे पुन्हा ‘खळ्ळ खट्यॅक’, IPL खेळाडूंसाठी महाराष्ट्राबाहेरुन आणलेल्या बसेस फोडल्या

कच्च्या तेलाचे दर 40 डॉलरनी घसरले; भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा

चंद्रपुरात रामदेवबाबा सालव्हंट कंपनीमुळे प्रदूषण? MPCB च्या मानकानुसार यंत्रणा बसवल्याची कंपनीची स्पष्टोक्ती

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.