मुंबईतील रेल्वे स्थानकांवर मोठ्या रांगा, बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांना तपासणीनंतरच प्रवेश

दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यांतून येणार्‍या रेल्वे प्रवाशांचे स्क्रीनिंग आणि चाचणी करण्यात येत आहे. (Entry To Outside Passengers Only After Screening Railway Stations In Mumbai)

 • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
 • Published On - 12:02 PM, 25 Nov 2020
Screening Railway Stations mumbai

मुंबई: नवी दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर परराज्यातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची कसून तपासणी केली जात आहे. (Entry To Outside Passengers Only After Screening Railway Stations In Mumbai)

दिल्ली, राजस्थान, गुजरात आणि गोवा राज्यांतून येणार्‍या रेल्वे प्रवाशांचे स्क्रीनिंग आणि चाचणी करण्यात येत आहे. बोरिवली स्थानकात आतापर्यंत 200 हून अधिक प्रवाशांची स्क्रीनिंग केली आहे. या तपासणीदरम्यान कोरोनाची लक्षणे असलेल्या प्रवाशाची चाचणी केली असता तो सकारात्मक आढळला आहे, त्याला तातडीने बोरिवली कोविड केंद्रात दाखल केले गेले, सध्या बोरिवलीसह अंधेरी, दादर, वांद्रे, मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, एलटीटीएन या ठिकाणीही प्रवाशांची तपासणी आणि चाचणी घेण्यात येत आहे. बोरिवली स्टेशनवर हा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असून, त्याला बोरिवली कोविड केंद्रात हलवण्यात आले आहे, तर जयपूर एक्सप्रेसमधून तो मुंबईत आला होता.

दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांची तपासणी

दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून मुंबईत दाखल होणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी सहा मुख्य रेल्वे स्थानकांवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांची पथके तैनात करण्यात आली आहेत. तपासणीदरम्यान प्रवाशाला लक्षणे आढळल्यास आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत आहे. यावेळी कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्यास प्रवाशाची कोरोना केंद्रात रवानगी करण्यात येणार आहे. बाधा नसल्याचे आढळल्यास घरी पाठविण्यात येईल, असे पालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून हवाई, रेल्वे आणि रस्ते मार्गाने महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला कोरोना चाचणी करूनच यावे लागेल. कोरोनाची बाधा झालेली नसल्याचा अहवाल पाहूनच प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा द्यावी, असे राज्य सरकारचे निर्देश आहेत. (Entry To Outside Passengers Only After Screening Railway Stations In Mumbai)

कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या कोगनोळी टोलनाक्यावर कोणतीही खबरदारी नाही

महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली असल्याने दिल्ली, एनसीआर, गुजरात, राजस्थान आणि गोव्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आलीय. मात्र कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या कोगनोळी टोलनाक्यावर कोणतीही खबरदारी शासनाकडून घेण्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे.

नव्या निर्देशानुसार उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली या राज्यातून महाराष्ट्रात विमान आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 72 तासाची कोव्हिड टेस्ट सक्तीची करण्यात आली आहे. तसेच दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत आणणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

विमानाने प्रवास करत असाल तर…

 • दिल्ली, गोवा, राजस्थान आणि गुजरातमधून हवाईमार्गे मुंबईत येणाऱ्यांनी आरटीपीसीआर निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट सोबत आणणं बंधनकारक आहे. विमानतळावर या रिपोर्टची विचारणा करण्यात आल्यावर तो दाखवणं बंधनकारक आहे.
 • महाराष्ट्रात येण्यापूर्वी 72 तासांत ही आरटीपीसीआर चाचणी करण्यात यावी
 • प्रवाशाने आरटीपीसीआर चाचणी केली नसेल तर विमानतळावर त्याची चाचणी करण्यात येईल. त्याचा खर्च प्रवाशालाच करावा लागणार आहे.
 • विमानतळावर कोरोना चाचणी केल्यानंतर प्रवाशांना घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. त्यानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावरच प्रवाशाला त्याची माहिती कळवली जाईल.
 • प्रवाशाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्याच्याशी प्रोटोकॉलनुसारच व्यवहार केला जाईल.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी…

 • दिल्ली, राजस्थान, गोवा आणि गुजरातमधून महाराष्ट्रात रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांनाही आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असावा.
 • महाराष्ट्रात प्रवासाला येण्यापूर्वी 96 तासांत त्यांनी आरटीपीसीआर चाचणी करावी.
 • प्रवाशाकडे आरटीपीसीआर चाचणी अहवाल नसेल तर रेल्वेस्थानकांवर त्यांच्या शरीराचं तापमान तपासलं जाईल.
 • प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे नसतील तरच त्यांना राज्यात प्रवेश दिला जाईल.
 • ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवतील त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात येईल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांनी परत त्यांच्या राज्यात पाठवलं जाईल.
 • एखाद्याला कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्याला कोविड सेंटरमध्ये पाठवलं जाईल. (maharashtra government issues new covid-19 guidelines for delhi, rajasthan and goa people)

रस्ते मार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी….

 • दिल्ली, गोवा, राजस्थान आणि गुजरातमधून येणाऱ्या प्रवाशांच्या शारिरीक तपासणीसाठी जिल्हाधिकारी राज्यांच्या सीमेवर व्यवस्था करतील.
 • कोरोनाची लक्षणे नसलेल्या प्रवाशांना राज्यात प्रवेश दिला जाईल. कोरोनाची लक्षणे असलेल्यांना त्यांच्या राज्यात जावं लागणार आहे.
 • ज्या प्रवाशांमध्ये कोरोनाची लक्षणे जाणवतील त्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात येईल. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना महाराष्ट्रात पुढचा प्रवास करता येईल.
 • एखाद्याला कोरोनाची लक्षणं आढळल्यास त्याला कोविड सेंटरमध्ये पाठवलं जाईल.

संबंधित बातम्या

Mumbai Local | मुंबईत कोरोना वाढला, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर

कोरोना व्हायरस मानवी त्वचेवर किती वेळ जिवंत राहतो? संशोधनात अंचबित करणारी माहिती समोर

(Entry To Outside Passengers Only After Screening Railway Stations In Mumbai)