खोपोलीजवळील रासायनिक लघू उद्योगात स्फोट, एकाचा मृत्यू तर चार जण जखमी, मोठी वित्तहानी

खोपोलीजवळील साजगाव येथील आर्कोस औद्योगिक नगरीतील रसायनिक उत्पादन करण्याऱ्या लघू उद्योग जसनोवा केमिकलमधील रिअॅक्टरचा रात्री 2.30 च्या सुमारास जोरादार स्फोट झाला.

खोपोलीजवळील रासायनिक लघू उद्योगात स्फोट, एकाचा मृत्यू तर चार जण जखमी, मोठी वित्तहानी
Follow us
| Updated on: Nov 05, 2020 | 8:23 AM

रायगड : खोपोलीजवळील (Khopoli) साजगाव येथील आर्कोस औद्योगिक नगरीतील रसायनिक उत्पादन करण्याऱ्या लघू उद्योग जसनोवा केमिकलमधील रिअॅक्टरचा रात्री 2.30 च्या सुमारास जोरादार स्फोट झाला. या स्फोटाच्या दणक्याने त्या कंपनीसह शेजारच्या इतर कंपन्यांचे शेड पडले, त्यामुळे शेजारील पेट्रोसोल कपंनीतील सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन ते चार सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. जखमींना खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Explosion in small scale chemical industry near Khopoli, One dead, four injured)

येथील आर्कोस औद्योगिक नगरीतील रसायनिक उत्पादन करण्याऱ्या जसनोवा केमिकलमधील रिअॅक्टरचा रात्री 2.30 च्या सुमारास जोरादार स्फोट झाला. या स्फोटाचा तीन-चार किलोमीटरच्या परिसरात मोठा आवाज झाला. तसेच आर्कोस औद्योगिक नगरीच्या आसपास एक किलोमीटरच्या परिसरातीतल अनेक घरांच्या खिडक्यांच्या तसेच अनेक कंपन्यांच्या काचा तुटल्या, पत्र्यांचे शेड कोसळले.

दरम्यान, आगीच्या घटनेची माहिती मिळताच खोपोली नगरपरिषद, एचपीसीएल, रिलायन्स, उत्तम स्टील, टाटा स्टील, कर्जत नगरपरिषद आणि पेण नगरपरिषदेच्या एकूण 10 फायर ब्रिगेड टीमने चार तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियत्रंण मिळविले. स्फोटाचा आवाज कानावर पडताच परिसरातील ग्रामस्थांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली. शेजारील अनेक लघू उद्योगातील कामगारांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी हलविले.

खालापूर उपविभागीय अधिकारी सजंय शुक्ला, खोपोली पोलीस निरीक्षक धनाजी क्षीरसागर, सह पो. नि. असवरे, पीएसआय वळसंग, पीएसआय किसवे यांच्यासह खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तिथल्या लोकांची मदत केली.

संबंधित बातम्या

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची ओढणीने गळा आवळून हत्या, मृतदेह ड्रममध्ये भरुन खोपोलीत फेकला

खोपोलीजवळ अज्ञात ट्रकची 5 वाहनांना धडक, खोपोली-लोणावळा वाहतूक ठप्प

‘मुंबई-पुणे एक्सप्रेस वे’वर साखरेच्या पोत्याचा ट्रक पलटी, दोन अपघातात दोघांचा मृत्यू

(Explosion in small scale chemical industry near Khopoli, One dead, four injured)

Non Stop LIVE Update
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.