उस्मानाबादमध्ये मतदानाचं फेसबुक लाईव्ह, गुन्हा दाखल करण्याचे आदेश

उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज मतदानादरम्यान अनोखे प्रकार पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदान करतानाचे फोटो काढून थेट सोशल मीडियावर शेअर केले. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने चक्क मतदानावेळीच फेसबुक लाईव्ह केलं. मतदान करताना कोणाला मतदान केलं, हे दाखवण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले. मात्र याप्रकारामुळे मतदानाची गोपनीयता भंग होत असल्याने, […]

उस्मानाबादमध्ये मतदानाचं फेसबुक लाईव्ह, गुन्हा दाखल करण्याचे आदेश
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

उस्मानाबाद : उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात आज मतदानादरम्यान अनोखे प्रकार पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मतदान करतानाचे फोटो काढून थेट सोशल मीडियावर शेअर केले. इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने चक्क मतदानावेळीच फेसबुक लाईव्ह केलं.

मतदान करताना कोणाला मतदान केलं, हे दाखवण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ काढण्यात आले. मात्र याप्रकारामुळे मतदानाची गोपनीयता भंग होत असल्याने, संबंधितांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले.

मतदानाचे फोटो फेसबुकवर टाकल्याप्रकरणी प्रणव वीर पाटील, ओंकार भुसारे, महेश मगर, सागर बागल यांच्यावर गुन्हा नोंद करण्याचे आदेश, सहाय्यक निवडणूक अधिकारी चेतन गिरासे यांनी दिले.

मतदानाची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी फेसबुकवर फोटो आणि लाईव्ह व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर गुन्हा नोंद करा, असे आदेश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुंडे यीं पोलीस प्रशासनाला दिले होते. IPC 188 प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे कलम असून, त्याअंतर्गत गुन्हे नोंदवण्यास सांगितलं.

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून मतदानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते.

फेसबुक लाईव्ह

दरम्यान, उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने मतदानावेळी फेसबुक लाईव्ह केलं. प्रणव पाटील असं या कार्यकर्त्याचं नाव आहे. EVM वर मतदान करताना कोणाला मतदान केलं हे दाखवण्यासाठी प्रणव पाटीलने फेसबुक लाईव्ह केलं.

उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीकडून राणा जगजीतसिंह पाटील विरुद्ध शिवसेनेकडून ओमराजे निंबाळकर यांच्यात लढत होत आहे.

उस्मानाबादमध्ये 14 उमेदवार रिंगणात असून 18 लाख 86 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकमध्ये राष्ट्रवादीचे राणा पाटील आणि शिवसेनेचे ओम राजे यांच्यात सरळ लढत होत आहे.

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.