Fact Check : पंकजा मुंडेंच्या संविधानाबाबतच्या वक्तव्याशी छेडछाड, काय आहे सत्य?

बीड : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय. पंकजा मुंडेंनी घटना बदलण्याचं वक्तव्य केल्याचा दावा या व्हिडीओत केला जातोय. पण टीव्ही 9 मराठीच्या पडताळणीत हा व्हिडीओ खोटा ठरलाय. आम्ही जेव्हा व्हायरल व्हिडीओ आणि त्यांचं खरं भाषण ऐकलं तेव्हा यातून सत्य परिस्थिती समोर आली. भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे …

Pankaja munde viral video, Fact Check : पंकजा मुंडेंच्या संविधानाबाबतच्या वक्तव्याशी छेडछाड, काय आहे सत्य?

बीड : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जातोय. पंकजा मुंडेंनी घटना बदलण्याचं वक्तव्य केल्याचा दावा या व्हिडीओत केला जातोय. पण टीव्ही 9 मराठीच्या पडताळणीत हा व्हिडीओ खोटा ठरलाय. आम्ही जेव्हा व्हायरल व्हिडीओ आणि त्यांचं खरं भाषण ऐकलं तेव्हा यातून सत्य परिस्थिती समोर आली.

भाजपच्या बीडच्या उमेदवार डॉ. प्रितम मुंडे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अंबाजोगाईमध्ये भाजपची सभा झाली. पंकजांचा या सभेतल्या भाषणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. बीडमध्ये विरोधकांकडून या व्हिडीओवर टीका करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी व्हायरल व्हिडीओचा आधार घेत पंकजांवर टीका केली. घटना बदलणं हे चिक्की खाण्याएवढं सोप्प नसतं, अशी टीका त्यांनी केली. पण खरं वक्तव्य हे वेगळंच असल्याचं समोर आलंय.

काय आहे व्हायरल व्हिडीओ?

“या देशाची राज्यघटना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. तिथे जाऊन आपल्याला घटनेमध्ये (व्हिडीओशी छेडछाड) बदल करायचाय. काही बिलं आणायचीत, काही नवीन नियम करायचेत. केवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे,” असं वक्तव्य या व्हायरल व्हिडीओत करण्यात आलंय.

काय आहे सत्य?

पंकजा मुंडेंनी ज्या घटनाबदलाचा उल्लेख केला, तो संसदेचा घटनाबदलाचा (घटना संशोधन/दुरुस्ती) अधिकार (कलम 368) आहे. घटनाबदलांसाठी संसदेतील खासदारांच्या मताची आवश्यकता असते. आतापर्यंत घटनेत 103 वेळा संशोधन करण्यात आलंय. नुकतंच 10 टक्के आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासाठीही घटनेत संशोधन करण्यात आलं होतं. त्यामुळे अभ्यासू खासदार दिल्लीत पाठवा असं पंकजा म्हणाल्या. पण घटना संशोधन याऐवजी घटनाबदल हा शब्द त्यांनी वापरला आणि त्यांच्या वक्तव्याशी छेडछाड करण्यात आली. “ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही, लोकसभेची, संसदेची निवडणूक आहे. या देशाची राज्यघटना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. तिथे जाऊन आपल्याला घटनेमध्ये बदल करायचाय, काही बिलं आणायचीत, काही नवीन नियम करायचेत. केवढा मोठा माणूस तिथे गेला पाहिजे.. किती अभ्यासू, किती विचारवंत आणि किती समजणारा माणूस तिथे गेला पाहिजे. कधी या गोष्टींचा विचार आपल्या लोकशाहीमध्ये होणार आहे,” असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

VIDEO : पाहा दोन्ही व्हिडीओ

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *