महाविकास आघाडीमुळेच काँग्रेसचं पतन, संजय निरुपमांचा घणाघात

जर पक्ष जिवंत असेल तर आपण सर्व आहोत, असंही संजय निरुपमांनी सांगितलंय.

  • गोविंद ठाकूर, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 22:27 PM, 16 Jan 2021
महाविकास आघाडीमुळेच काँग्रेसचं पतन, संजय निरुपमांचा घणाघात

मुंबईः ”काँग्रेसनं महाविकास आघाडीबरोबर जात शिवसेनेबरोबर युती केली, तेव्हापासून काँग्रेसचं पतन होऊ लागले”, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केलीय, ते मुंबईतल्या काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. गेल्या दीड वर्षांपासून सर्व काही शांत होते, म्हणूनच मी काही तरी बोलायचो, परंतु भाई जगताप यांनी आता सुरुवात केलीय. मी भाई जगताप यांच्यासोबत आहे. दिवसरात्र मेहनत करेन आणि पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाची बाजू भक्कम करेन, जर पक्ष जिवंत असेल तर आपण सर्व आहोत, असंही संजय निरुपमांनी सांगितलंय. (Fall Of Congress Due To Mahavikas Aghadi, Sanjay Nirupam Criticize)

तर पहिल्यांदा लस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली असतीः संजय निरुपम

देशात आणि महाराष्ट्रात बर्‍याच गोष्टी घडत आहेत, हे थांबवणारे कोणीच नाही, जे सत्तेत आहेत, त्यांना शांतपणे बसावे लागतंय. लस आली आहे, जर खरंच ही लस चांगली असती तर पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली असती. त्याचे दुष्परिणाम त्यांना समजले असते. अमेरिकेतील अनेक लोक वेगवेगळ्या आजाराचे शिकार झालेत. त्यामुळे त्यांना लस देण्यात आलेली नाही. शेतकरी आंदोलनाविरोधात चर्चा सुरू आहेत, पण राहुल गांधी हे शेतकर्‍यांच्या पाठीशी आहेत, दिल्ली सरकार कोणाचे ऐकत नाही, असंही संजय निरुपम म्हणालेत.

गोस्वामी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला: संजय निरुपम

2014 च्या निवडणुका सुरू होण्याआधीच अर्णव गोस्वामी यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. जागतिक घोटाळा शोधणाराच आता स्वतः घोटाळ्यांमध्ये अडकलाय, अर्णवच्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. मुंबईत काँग्रेस पक्षाच्या ताकदीवर आम्ही निवडणुका लढणार आहोत. मुंबईत दोन, तर महाराष्ट्रात काँग्रेसचे 12 मंत्री आहेत. सरकारच्या ताकदीचा वापर करा आणि निवडणूक लढा, असं आवाहनही संजय निरुपम यांनी केलंय. सरकारला किती वेळा निर्णय बदलावे लागतात हे कोरोना काळात आम्ही पाहिले, सरकारमध्ये असताना अस्लम शेख यांना निषेध करावा लागतोय, सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे कौतुक करण्याची गरज नाही, असंही संजय निरुपम म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या

तर ठाकरे सरकारला धोका, निरुपम यांचा ‘औरंगाबाद’वर इशारा

शिवसेनेनं आम्हाला सल्ला देऊ नये, अशोक चव्हाणांनी राऊतांना फटकारलं

Fall Of Congress Due To Mahavikas Aghadi, Sanjay Nirupam Criticize