मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण; कोबी 10 रुपये, कोथिंबीर 6 रुपये, तर टोमॅटो 15 रुपये किलो

आता बाजारात भाज्यांचे दर कोसळले असून, कालपर्यंत ४० रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कोबी आणि फ्लॉवर आज १० रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे.

  • सुरेश दास, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई
  • Published On - 23:14 PM, 19 Nov 2020
मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांच्या दरात घसरण; कोबी 10 रुपये, कोथिंबीर 6 रुपये, तर टोमॅटो 15 रुपये किलो

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. भाजीपाला मार्केटमध्ये आज एकूण 625 गाड्यांची आवक झाली असून, भाज्यांच्या दरात घसरण सुरूच आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किमती वाढल्या होत्या, मात्र आता बाजारात भाज्यांचे दर कोसळले असून, कालपर्यंत 40 रुपये प्रतिकिलोने विकला जाणारा कोबी आणि फ्लॉवर आज 10 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. (Falling Prices Of Vegetables In Mumbai APMC Vegetable Market)

तसेच भेंडी 15 रुपये, 30 रुपये जुडी विकला जाणाऱ्या कोथिंबीर 8 रुपये जुडी झाला आहे, मात्र किरकोळ बाजारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने घाऊक बाजारात स्वस्त दरात मिळत असलेला भाजीपाला किरकोळ बाजारात दुप्पट दराने विकला जात आहे.

मुंबई एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आज जवळपास 622 गाड्यांची आवक झाली असून, भाजीपाल्याच्या दरात घसरण सुरूच आहे. तर सध्या बाजारात फ्लॉवर 8 ते 10 रुपये, कोबी 8 ते 12 रुपये, मिरची 20 ते 30 रुपये, काकडी 6 ते 10 रुपये किलो विकली जात असून, टोमॅटो 15 ते 20 रुपये, वांगी 20 ते 30 रुपये तर कोथिंबीर 8 ते 10 रुपये, मेथी 10 ते 15 रुपये, पालक 5 ते 10 रुपये दराने विकली जात आहे.

APMC मार्केटमधील भाज्यांचे दर

फरसबी 30 ते 40 रुपये प्रतिकिलो
फ्लॉवर 8 ते 10 रुपये प्रतिकिलो
गवार 30 ते 40 रुपये प्रतिकिलो
गाजर 20 ते 30 रुपये प्रतिकिलो
भेंडी 10 ते 15 रुपये प्रतिकिलो
कोबी 8 ते 12 रुपये प्रतिकिलो
मिरची 25 ते 35 रुपये प्रतिकिलो
टोमॅटो 15 ते 20 रुपये प्रतिकिलो
काकडी 6 ते 10 रुपये प्रतिकिलो
वांगी 20 ते 30 रुपये प्रतिकिलो
कोथिंबीर 8 ते 10 रुपये प्रतिकिलो
वाटाणा 26 ते 40 रुपये किलो

गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मात्र, आता भाजीपाला मार्केटमध्ये आज एकूण 596 गाड्यांची आवक झाली आणि भाज्यांच्या दरात घसरण सुरु आहे. परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीमुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई एपीएमसी घाऊक बाजारात भाज्यांच्या किमती वाढल्या होत्या. एपीएमसीत दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारावर कोणाचे नियंत्रण नसल्याने घाऊक बाजारात स्वस्त दरात मिळत असलेला भाजीपाला किरकोळ बाजारात दुप्पट दराने विकला जात आहे.