"फडणवीसांच्या कर्जमाफीवर ओरडणाऱ्यांनी सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केली"

शेतकरी नेते अजित नवले यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकासआघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे (Ajit Nawale criticize Loan Waiver).

Ajit Nawale criticize Loan Waiver, “फडणवीसांच्या कर्जमाफीवर ओरडणाऱ्यांनी सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची फसवणूक केली”

पुणे : शेतकरी नेते अजित नवले यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकासआघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे (Ajit Nawale criticize Loan Waiver). जे देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कर्जमाफीवर आणि त्यातील जाचक अटींवर ओरडत होते, त्यांनी सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांची फसवणूकच केल्याचं मत शेतकरी नेते अजित नवले यांनी व्यक्त केले (Ajit Nawale criticize Loan Waiver).

अजित नवले म्हणाले, “महाविकासआघाडी सरकारने कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे. सत्तेत असणारे हेच लोक फडणवीसांच्या कर्जमाफीवर ओरडत होते. मात्र, सत्तेत आल्यावर त्यांनीच फसवणूक केली.” सरकारने सातबारा कोरा करण्याचं आश्वासन पाळावं, अन्यथा किसान सभा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा अजित नवले यांनी दिला.

“एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा नव्याने विचार करुन शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असं आश्वासन द्यायचं. दुसरीकडे मात्र, 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवायचं, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळायचं. पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना वगळायचं आणि सर्व अटीशर्ती पुन्हा लादायच्या हा शेतकऱ्यांवरील अन्याय आहे. हा अन्याय दूर करावा असं आम्ही आवाहन करतो. हा शासन आदेश मागे घ्यावा आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सर्व प्रकारच्या अटी हटवून नव्याने शासन आदेश काढावा असं आवाहन आम्ही किसान सभेच्यावतीने आम्ही करतो”, असं मत अजित नवले यांनी व्यक्त केलं.

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी देखील सरकारच्या कर्जमाफीवर नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्याला चिंतामुक्त आणि कर्जमुक्त करण्याचं आश्वासन दिलं होतं. ते आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. यावर्षी अवकाळी पाऊस, महापूर अशा अनेक नैसर्गिक आपत्तींनी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बाधित आहे. म्हणूनच ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *