‘सासरेबुवा (ऊर्जामंत्री), तुमची मुलगी (वीज) नीट नांदत नाही’

नागपूर: अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकलीने राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं. या पत्रातून भारनियमनाबाबत शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडली आहे. ‘सासरेबुवा (ऊर्जामंत्री) तुम्ही दिलेली वीज नावाची मुलगी नीट नांदत नाही’, ‘वीज ही मुलगी सात वाजता जाते ते रात्री12 वाजता येते’, कधी कधी जाते तर 2-2 दिवस येतच नाही’, असं या पत्रात म्हटलं आहे. […]

'सासरेबुवा (ऊर्जामंत्री), तुमची मुलगी (वीज) नीट नांदत नाही'
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

नागपूर: अवघ्या दहा वर्षाच्या चिमुकलीने राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेलं पत्र वाचून दाखवलं. या पत्रातून भारनियमनाबाबत शेतकऱ्यांच्या व्यथांना वाचा फोडली आहे. ‘सासरेबुवा (ऊर्जामंत्री) तुम्ही दिलेली वीज नावाची मुलगी नीट नांदत नाही’, ‘वीज ही मुलगी सात वाजता जाते ते रात्री12 वाजता येते’, कधी कधी जाते तर 2-2 दिवस येतच नाही’, असं या पत्रात म्हटलं आहे.

काय आहे पत्रात?

प्रिय, सासरेबुवा ( ऊर्जामंत्री),

तुम्ही दिलेली ‘वीज’ नावाची मुलगी नीट नांदत नाही, सातला गेली की रात्री बाराला येते आणि कधी बाराला गेली की रात्रभर येतंच नाही. कधी कधी तर 2-2 दिवस येत नाही. मग सांगा सिंचन कसं करायचं, तुमच्या या ‘वीज’ नावाच्या मुलीसोबत संसार कसा करायचा? असा प्रश्न या पत्रात विचारण्यात आला आहे.

हे पत्र एका शेतकऱ्याने लिहिलं आहे. ते पत्र नागपूरच्या तुलसी हिवरे या मुलीने आपल्या शब्दात सादर केलं.

10 वर्षांच्या चिमुकलीने राज्यभरातील शेतकऱ्यांच्या व्यथा या पत्राद्वारे सर्वांसमोर मांडल्या. एका शेतकऱ्याने राज्याचे ऊर्जामंत्री आणि वीज नावाची मुलगी देणाऱ्या सासरेबुवाला म्हणजेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना लिहिलेलं पत्र आपल्या शब्दात तिनं मांडलं. तुलसी हिवरे असं या सहावीत शिकणाऱ्या चिमुकलीचं नाव आहे.

‘सचिन तेंडुलकरला क्रिकेटमध्ये धावा काढल्यामुळे भारतरत्न मिळाला. इकडे माझा शेतकरी शेतीत आवतामागे (वखर) फिरत रोज हजारो धावा काढतो. त्याला भारतरत्न तर सोडाच त्याच्या शेतमालाला साधा भावही मिळत नाही’ याबाबतचं वास्तवंही तिने मांडलं.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.