मुंबईत 29 डिसेंबरपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, एरिएल मिसाईलवर बंदी

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020 पर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणांवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबईत 29 डिसेंबरपर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, एरिएल मिसाईलवर बंदी
Follow us
| Updated on: Dec 01, 2020 | 9:41 PM

मुंबई : मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात 29 डिसेंबर 2020 पर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरिएल मिसाईल आदी उपकरणांवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (feared terror attack in mumbai ban drone Duration extended Mumbai Police)

मुंबई पोलीस उपआयुक्त (संचलन) तथा कार्यकारी दंडाधिकारी एस.चैतन्य यांनी हे आदेश दिले असून या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भा.द.वि. 1960 कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे.

मुंबईवर ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, एरियल क्षेपणास्त्र किंवा पॅरा ग्लायडर्सद्वारे हल्ला होऊ शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे या उपकरणांवर याअगोदर  30 ऑक्टोबर 2020 पासून 28 नोव्हेंबर 2020 पर्यंत बंदी घालण्यात आली होती. आता पुन्हा एकदा बंदीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तालयाने घेतला आहे.

दहशतवाद्यांकडून व्हीव्हीआयपी ठिकाणांना लक्ष्य केले जाऊ शकते. अशा परिस्थितीत ड्रोन, लाईट एअरक्राफ्ट, पॅरा ग्लाइडिंगला 29 डिसेंबरपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.  गुप्तचर यंत्रणांकडून हाय अलर्ट मिळाल्यानंतर पोलीस सतर्क झाले आहेत.

सार्वजनिक मालमत्ता हे दहशतवाद्यांचे लक्ष्य असू शकते सार्वजनिक मालमत्तादेखील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असू शकते. इंटेलिजन्स विभागाच्या सूचनेनंतर परिसरात कोणत्याही उड्डाण करणा-या वस्तूवर बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश पुढील 29 डिसेंबरपर्यंत लागू असेल, असे आदेशात म्हटले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर भा.द.वि. 1960 कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असे या आदेशात म्हटले आहे. सामान्य लोकांनी घाबरु नये तर सावधगिरी बाळगावी. घाबरून जाण्याची गरज नाही, प्रत्येक जणानं सावध राहा, असं आवाहन डीसीपी चैतन्य यांनी लोकांना केले आहे.

(feared terror attack in mumbai ban drone Duration extended Mumbai Police)

संबंधित बातम्या

मुंबईवर मोठ्या दहशतवादी हल्ल्याचं सावट; ड्रोन उड्डाणांवर बंदी

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.