माजी मंत्री गिरीश महाजनांविरोधात गुन्हा दाखल, चाकूचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी मंत्री गिरीश महाजनांविरोधात गुन्हा दाखल, चाकूचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 1:58 PM

जळगाव : माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी गिरीश महाजन यांनी चाकूचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Filed case against former minister Girish Mahajan accused of threatening to take possession of the organization)

जळगाव इथल्या मराठा विद्या प्रसारक सहकारी संस्थेच्या ताबा मिळवण्यासाठी जानेवारी 2018 मध्ये भोईटे गटाकडून एडवोकेट विजय पाटील यांना पुण्यात बोलवून धमकावल्या प्रकरणी वकील विजय पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये महाजन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इतकंच नाही तर अधिक माहितीनुसार, या प्रकरणात गिरीश महाजन यांच्यासह भोईटे गटातील सदस्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन वर्षांपूर्वी पुण्यात घडलेल्या या घटनेचा अखेर निंभोरा इथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्यामुळे आता यावर पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दखल करून निंभोरा पोलिसांनी गुन्हा वर्ग केला आहे. यासाठी पुणे कोथरूड पोलीस स्टेशनकडे तब्बल 18 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतर बातम्या –

कोण संजय राऊत?, ‘त्या’ विधानावरून चंद्रकांत पाटलांनी उडवली खिल्ली

जनतेला अहंकार आणि भाषण नको, काम हवं, रोहित पवारांचा भाजपवर हल्ला

(Filed case against former minister Girish Mahajan accused of threatening to take possession of the organization)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.