‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ फेरी; अकरावी प्रवेशाची आणखी एक संधी

बुधवारपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबवण्यात येणार आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:41 AM, 12 Jan 2021

मुंबईः कोरोनाच्या संकटकाळात राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालक मंडळाकडून इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत (Eleventh Admission online process)काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. त्यानंतर तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या राबवण्याचा हजारो विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाकडून निर्णय घेण्यात आला. परंतु अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या तीन नियमित आणि दोन विशेष फेऱ्या राबवल्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी बुधवारपासून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी राबवण्यात येणार आहे. (‘First come first served’ round; Another chance for the 11th admission entry)

आतापर्यंतच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये महाविद्यालय अलॉट न झालेले, मिळालेला प्रवेश रद्द केलेले, प्रवेश नाकारलेले तसेच दहावीच्या फेरपरीक्षेतील उत्तीर्ण, दहावीच्या मुख्य परीक्षेत एटीकेटी असलेले विद्यार्थी या फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी ही अकरावी प्रवेशाची अखेरची फेरी असणार आहे. या फेरीनंतर विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात येणार नाही, असे आवाहनही शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी केले आहे. तसेच 29 जानेवारीपासून एटीकेटी आणि फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. मुंबई विभागात अकरावीच्या एकूण 3,20,390 जागा असून, या प्रवेशानंतर 1 लाख 24 हजार 254 जागा रिक्त आहेत.

आतापर्यंत झालेले प्रवेश

कला- 19,346
वाणिज्य- 1,11,211
विज्ञान- 63,300
एचएसव्हीसी- 2279
एकूण – 1, 96,136

प्रवेशाचे वेळापत्रक

13 जानेवारी 90 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
13 ते 15 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश गेणे
15 जानेवारी- रिक्त जागा जाहीर
16 जानेवारी 80 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
16 ते 18 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे
18 जानेवारी- रिक्त जागा जाहीर
18 जानेवारी 79 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
19 ते 20 जानेवारी- महाविद्यालयामध्ये जाऊन प्रवेश घेणे
20 जानेवारी- रिक्त जागा जाहीर
21 जानेवारी- 60 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
21 ते 22 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश गेणे
22 जानेवारी- रिक्त जागा जाहीर
23 जानेवारी- 50 ते 100 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश
22 ते 25 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे
25 जानेवारी- रिक्त जागा जाहीर
27 जानेवारी- उत्तीर्ण प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश
27 ते 28 जानेवारी- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे
28 जानेवारी- रिक्त जागा जाहीर

संबंधित बातम्या

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल, माध्यमिक शिक्षण संचालक मंडळाच्या सूचना

FYJC | अकरावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन वर्ग

‘First come first served’ round; Another chance for the 11th admission entry