शाळेचा पहिला दिवस, साताऱ्याचा पठ्ठ्या घोड्यावरुन आला!

साताऱ्यातील जावळी तालुक्यात असणाऱ्या भणंग गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या  शिक्षकांनी पहिल्याच दिवशी, पहिलीच्या विद्यार्थांना घोड्यावर आणि रथातून सवारी घडवून आणली. 

शाळेचा पहिला दिवस, साताऱ्याचा पठ्ठ्या घोड्यावरुन आला!

सातारा : शाळांचा आज पहिला दिवस. पहिल्या दिवशी शाळेच्या भीतीने अनेक चिमुकले रडून रडून शाळा डोक्यावर घेतात. अशावेळी या चिमुकल्यांची भीती घालवण्यासाठी अनेक शाळा नवनव्या कल्पना लढवत असतात. कोण चॉकलेट वाटून तर कोणी छोटा भीमच्या बाहुल्याद्वारे चिमुकल्यांचं शाळेत स्वागत करतो. साताऱ्यातील एका शाळेत चिमुकल्यांचं स्वागत चक्क घोड्यावर बसून करण्यात आलं.

साताऱ्यातील जावळी तालुक्यात असणाऱ्या भणंग गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या  शिक्षकांनी पहिल्याच दिवशी, पहिलीच्या विद्यार्थांना घोड्यावर आणि रथातून सवारी घडवून आणली.

मुलांना पहिल्या दिवसापासूनच शाळेची ओढ निर्माण व्हावी म्हणून शिक्षकांनी मुलांसाठी खास रथाची आणि घोड्याच्या सवारीची सोय केली होती. शाळेतील नव्याने दाखल झालेल्या इयत्ता पहिलीच्या मुलांना रथात बसवून, गावातून  फेरफटका मारला.

पहिल्यांदाच घोड्यावर आणि रथातून फेरफटका मारल्यामुळे शाळेतली सर्वच मुलं खुप आनंदी झाली. सध्या पालक जिल्हा परिषद, नगरपालिका शाळांमध्ये मुलांना दाखल करण्यास अनुत्सुक दिसतात. त्यामुळे शिक्षकांना असे प्रयोग करावे लागत आहेत.

जावळी तालुक्यातील भणंग हे गाव दुर्गम भागातील असल्याने, या गावातील पालकांसाठी जवळच असणाऱ्या मेढा गावात उच्च शिक्षण देणारी पर्यायी शाळा आहे. मात्र या शाळेचा दर्जा वाढल्याने भागातील विद्यार्थी या शाळेत येत आहेत. येथील शिक्षक वर्ग या पालकांच्या विश्वासाला तडा जाऊ नये, यासाठी असे अनेक नवनवीन उपक्रम राबवताना दिसत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *