घरातला कचरा द्या आणि पैसे घ्या, राज्यातल्या पहिल्या कचरा बँकेची सुरुवात

वर्धा : अलीकडे कचऱ्याकडेही गांभीर्याने पाहिले जात आहे. कचऱ्यातून खत निर्मिती होते आणि हे खत पैसाही देऊन जाते हे कळायला लागल्यावर कचरा आता लाख मोलाचा झाला आहे. तर सुका कचरा रिसायकलिंगच्या साहाय्याने अर्थपूर्ण ठरतोय. अशात याच कचऱ्याच्या अर्थकारणाचा विचार करून वर्धा जिल्ह्यातील कारंजा नगर पंचायतमध्ये ‘कचरा बँक’ ही अभिनव संकल्पना राबविली जात आहे. लोकांकडून ज्याला …

घरातला कचरा द्या आणि पैसे घ्या, राज्यातल्या पहिल्या कचरा बँकेची सुरुवात

वर्धा : अलीकडे कचऱ्याकडेही गांभीर्याने पाहिले जात आहे. कचऱ्यातून खत निर्मिती होते आणि हे खत पैसाही देऊन जाते हे कळायला लागल्यावर कचरा आता लाख मोलाचा झाला आहे. तर सुका कचरा रिसायकलिंगच्या साहाय्याने अर्थपूर्ण ठरतोय. अशात याच कचऱ्याच्या अर्थकारणाचा विचार करून वर्धा जिल्ह्यातील कारंजा नगर पंचायतमध्ये ‘कचरा बँक’ ही अभिनव संकल्पना राबविली जात आहे.

लोकांकडून ज्याला मूल्य प्राप्त होईल असा सुका कचरा घ्यायचा आणि त्या कचऱ्याची कचरा मिळकत पासबुकमध्ये नोंद करायची. एका विशिष्ट दिवशी त्याचा मोबदलाही त्या नागरिकांना द्यायचा. असा हा उपक्रम कचऱ्याला कचरा न राहू देता त्याला लाख मोलाचा कचरा बनवित आहे.

आपल्याकडे जमा होणारे भंगार फेकून न देता ते घरीच ठेवायचे आहे. हा भंगार म्हणून गोळा होणारा कचरा घेण्यासाठी नगर पंचायतीकडून रॅप किपर नागरिकांच्या घरी येणार आहेत. कारंजा नगर पंचायतच्या या अभिनव उपक्रमाचे नाव आहे ‘कचरा बँक’ . नागरिकांकडे असणाऱ्या कचरा मिळकत पासबुकमध्ये या कचऱ्याची वजनाप्रमाणे नोंद केली जाते. बँकेत हा कचरा पोहोचल्यावर त्याला वेगवेगळे केले जाते. प्लास्टिक बॉटल, लोखंडी पत्रे, बॉटल, प्लास्टिक कॅरिबॅग अशी त्याची विभागणी केली जाते .

स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून गावाला एक नवं रूप देण्याचं काम सध्या नगर पंचायतीने हाती घेतलं आहे. कचऱ्याने गजबजणारे रस्ते आता स्वच्छ दिसायला लागलेत. गावात सार्वजनिक शौचालय, जागोजागी स्वच्छता फलक, विहिरींचे सौंदर्यीकरण, ओपन जिमसह कचरापेट्या गावात नजरेस पडत आहेत. अभियानाच्या रूपाने सुरु केलेली स्वच्छता आता गावाला नवं रूप देताना दिसत आहे. यात गावातील शाळांसह सामाजिक काम करणाऱ्या संस्थाही उत्स्फूर्त सहभाग नोंदवीत आहेत.

कचरा बँक हा नगरपंचायतीचा सुरु झालेल्या या अभिनव उपक्रमातून आतापर्यंत 300 लोकांना मिळकत पासबुक देण्यात आलंय. शहरात रस्त्यावर नागरिकांकडून फेकण्यात आलेल्या पाण्याच्या बॉटल, पाउच यासह विविध वस्तू उचलत बँकेत जमा केल्या जातात.

महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. शहरांमध्ये तर डम्पिंग ग्राऊंड भरत आलेत आणि नवा कचरा टाकायला जागाही उरलेली नाही. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबाबत अनेकदा बोललं जातं. पण प्रत्यक्षात काहीही होत नाही. त्यामुळे कचरा बँकेचा हा अभिनव उपक्रम उत्सुकता निर्माण करणारा तर ठरतोय, शिवाय कचरा निर्मूलनाच्या मोहिमेत मोलाचाही ठरणारा आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *