मुंबईः सीरमच्या इमारतीला भीषण आग लागलेली असून, इमारतीत पाच जणांचा मृतदेह सापडल्यानं एकच खळबळ उडालीय. आग लागलेल्या इमारतीमध्ये पाच मृतदेह सापडलेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलंय. (Five people died in a fire at a serum building says rajesh tope)
आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी आज पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलीय. कोव्हिशील्ड लसीची बिल्डिंग आगीच्या स्थळापासून लांब आहे, त्यामुळे कोव्हिशिल्डच्या लसीला कोणतंही नुकसान झालेलं नाही. पोलिसांची चौकशी सुरू आहे. फायर ऑडिट करण्यात येणार आहे. तसेच या सर्व प्रकरणाचा तपास करण्यात येणार असल्याचं अजित पवार आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं. तसेच मुख्यमंत्र्यांनीही या सर्व प्रकाराची माहिती घेऊन गंभीर दखल घेतलेली आहे. राम शंकर हरिजन, बिपीन सरोज, सुशील कुमार पांडे, महेंद्र इंगळे, प्रतीक पाष्टे अशी मृतांची नावं असून, सर्वजण कंत्राटी कामगार आहेत.
MSEZ 3 या इमारतीला आग लागलीः राजेश टोपे
जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी बोललेलो आहे. त्यांच्या माहितीप्रमाणे MSEZ 3 म्हणजे मांजरीमधील जो कारखाना आहे, त्यामध्ये MSEZ 3 या इमारतीला आग लागली. त्या ठिकाणी रोटा व्हायरस प्लांट इन्स्टॉलेशनचे काम चालू होते. तिथे वेल्डिंगचं काम सुरू होतं. साधारण दुपारी दोन वाजता ही आग लागली. एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर जाधव आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी आहेत. त्यांनी घटनास्थळावरून ही माहिती दिलेली आहे. इमारतीतील मटेरियल आग भडकण्याला कारण ठरलं, असंही राजेश टोपे म्हणालेत.
We have just received some distressing updates; upon further investigation we have learnt that there has unfortunately been some loss of life at the incident. We are deeply saddened and offer our deepest condolences to the family members of the departed.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) January 21, 2021
वेल्डिंगच्या स्पार्कमुळे ही आग लागली : राजेश टोपे
वेल्डिंगच्या स्पार्कमुळे ही आग लागली आणि तिथे इन्सुलिनचं भरपूर मटेरियल होतं. ज्याला ज्वलनशीलता असते. त्यामुळे ती आग वाढत गेली. महापालिकेचे 5 टँकर आणि तीन आणखी वाटर टँकर तात्काळ बोलावण्यात आले. संपूर्ण आग विझवण्यात आलेली आहे. आग विझवण्यासाठी दोन ते तीन तास लागलेत. आता पूर्णतः आग विझलेली आहे. सगळं आता नियंत्रणात आहे. संपूर्ण आग विझल्यानंतर लोकांनी आत जाऊन पाहिलं. त्या ठिकाणी पाच मृतदेह आढळून आलेत, अशी माहितीसुद्धा राजेश टोपे यांनी दिलीय.
संबंधित बातम्या :
Serum Institute Fire Live | कोरोना लस निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला भीषण आग
Five people died in a fire at a serum building says rajesh tope