कोल्हापूरच्या कोव्हिड सेंटरमध्ये थेट फुटबॉल सामना, ‘पोर्ले विरुद्ध कोतोलीकर’ मॅचमध्ये कोरोनाबाधितांचाही सहभाग

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे कोव्हिड केअर सेंटरमध्येच चक्क फुटबॉलची मॅच पाहायला मिळाली (Football match in Kolhapur COVID centre).

कोल्हापूरच्या कोव्हिड सेंटरमध्ये थेट फुटबॉल सामना, 'पोर्ले विरुद्ध कोतोलीकर' मॅचमध्ये कोरोनाबाधितांचाही सहभाग
Follow us
| Updated on: Jul 27, 2020 | 10:41 AM

कोल्हापूर : कोरोनामुळे एकीकडे जगभरातील सगळ्याच क्रीडा स्पर्धा, विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. एव्हढेच काय तर ऑलम्पिकच्या स्पर्धा सुद्धा पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथे कोव्हिड केअर सेंटरमध्येच चक्क फुटबॉलची मॅच पाहायला मिळाली (Football match in Kolhapur COVID centre). ज्या कोव्हिड सेंटरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्याच सेंटरमध्ये दाखल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी फुटबॉलचा सामना खेळला.

कोल्हापूरमधील या कोव्हिडी केअर सेंटरमधील या फुटबॉल मॅचचा व्हिडिओ सध्या संपूर्ण जिल्ह्यात व्हायरल होत आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोक संबंधित रुग्णांनी कोरोना संसर्ग झालेला असतानाही त्याचं दडपण न घेता फुटबॉल खेळत आनंद घेतल्याचं म्हणत आहेत. तसेच त्यांच्या या कणखरपणाचं कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे या रुग्णांनी शारीरिक अंतराच्या नियमांची पायमल्ली करुन खेळल्याने त्यांना कोरोना संसर्गाचं गांभीर्य नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पन्हाळा तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 180 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यातील 112 सक्रिय कोरोना रुग्णांना वाघबिळ येथील एकलव्य पब्लिक स्कुलमधील कोव्हिड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. या एकूण 112 रुग्णांमध्ये वृद्धांसह तरुण वयातील मुलांचाही समावेश आहे. येथील बहुतांश रुग्णांना अद्याप कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. सर्वजण ठणठणीत बरे असल्याचे स्वतः रुग्ण सांगत आहेत.

वाघ बीडमधील या कोव्हिड केअर सेंटरमधल्या पॉझिटिव्ह रुग्णांनी पोर्ले आणि कोतोली गावातील रुग्णांच्या 2 टीम तयार केल्या. यानंतर पोर्ले विरुद्ध कोतोलीकर अशा रंगलेल्या सामन्याचा सर्वांनीच आनंद घेतला. यामुळे संबंधित कोरोना रुग्णांच्या मनावरील ताण काहीसा हलका झाला.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

असं असलं तरी खेळताना शारीरिक अंतराचा फज्जा उडाल्याचंही पाहायला मिळालं. त्यामुळे काहीशी नाराजीही व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांनी आजाराचा ताण बाजूला ठेवत दैनंदिन जगण्यातील मौज करत आनंद घेतल्यानं मदत होईल, असंही बोललं जात आहे. एकूणच कोरोना रुग्णांच्या या फुटबॉल सामन्याची संपूर्ण कोल्हापुरात जोरदार चर्चा सुरु आहे.

हेही वाचा :

पुणे जिल्ह्यात 500 खाजगी रुग्णवाहिकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा आरटीओकडे प्रस्ताव

Covaxin | कोवॅक्सिनचा पहिला टप्पा यशस्वी, 50 जणांवर चाचणी

Navi Mumbai Corona | कोरोनावर मात करण्यासाठी नवी मुंबईत ‘धारावी पॅटर्न’ लागू, आयुक्तांकडून प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा

Football match in Kolhapur COVID centre

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.