वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला, वर्ध्यात कृत्रिम पाणवठे वरदान बनले

वर्धा : दुष्काळामुळे माणसांना जेवढा त्रास सहन करावा लागतोय, त्यापेक्षा किती तरी अधिक त्रास प्राणी आणि पक्षी सहन करत आहेत. वर्धा जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. धरणांमध्ये जेमतेम जलसाठा झालाय. बहुतेक धरणं जंगलाने वेढली आहेत. या धरणाच्या पाण्यावर वन्यजीवाची तहान भागते. पण सध्याच्या स्थितीत बहुतेक धरणांनी तळ गाठलाय. जंगलातील कृत्रिम पाणवठ्यावर न पोहचणारा वन्यजीव मात्र पाण्यासाठी […]

वन्यप्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटला, वर्ध्यात कृत्रिम पाणवठे वरदान बनले
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

वर्धा : दुष्काळामुळे माणसांना जेवढा त्रास सहन करावा लागतोय, त्यापेक्षा किती तरी अधिक त्रास प्राणी आणि पक्षी सहन करत आहेत. वर्धा जिल्ह्यातही अशीच परिस्थिती आहे. धरणांमध्ये जेमतेम जलसाठा झालाय. बहुतेक धरणं जंगलाने वेढली आहेत. या धरणाच्या पाण्यावर वन्यजीवाची तहान भागते. पण सध्याच्या स्थितीत बहुतेक धरणांनी तळ गाठलाय. जंगलातील कृत्रिम पाणवठ्यावर न पोहचणारा वन्यजीव मात्र पाण्यासाठी वणवण फिरत आहे. जिल्ह्याच्या आठ वनपरिक्षेत्रात एकूण 150 कृत्रिम पाणवठे बनवण्यात आले आहेत. या पाणवठ्यावर जंगलातील प्राणी तहानही भागवताना दिसत आहेत.

नजर जाईल तिकडे भेगाळलेली जमीन आहे. एखादं डबकं वगळता जिकडे पाहावे तिकडे धरणाला कोरड पडली असताना तहान तरी कशी भागवायची असा प्रश्न सर्वांसमोरच आहे. आपण काहीही प्रयत्न करुन पाणी मिळवू शकतो, पण प्राण्यांच्या काही मर्यादा आहेत. जंगलातील पाणी संपल्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्यात हे कृत्रिम पाणवठे वरदान बनले आहेत.

मोठ्या, मध्यम तसच छोट्या धरणात जेमतेम पाणीसाठा आहे. बहुतेक धरणातील जलसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. टेकड्यावर चारा नाही. अशा भकास वातावरणात पशुपक्ष्यांना पाण्यासाठी भटकाव लागतंय. धरणाची ही विदारक स्थिती भविष्यातील बिकट संकटाची चाहूल देत आहे.

पाण्याचा शोध घेत सुसाट निघालेला निलगाईंचा कळप एकमेकांना सोबत घेऊन निघाल्याचंही कॅमेऱ्यात कैद झालंय. वानरही पाण्याच्या दिशेने धावत आहेत. वर्धा जिल्ह्यातील जंगलात वनविभाग, तसेच पीपल फॉर अनिमल्सच्या वतीने टाटा ट्रस्टच्या सहकार्याने जंगलातील कृत्रिम पाणवठ्यात नियमित पाणी भरलं जातंय. या कृत्रिम पाणवठ्यावर वन्यजीव आपली तहान भागवतात.

जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटले आहेत. नदी, नाले कोरडे पडलेत. त्यामुळे वन्यजीव साहजिकच गावात येणार. पण सध्या कृत्रिम पाणवठे, त्यात भरलं जाणारं पाणी वन्यजीवांसाठी तारणहार ठरत आहे. पाणी टंचाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे वन्यप्राणी आणि मानवी संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम पाणवठ्याच्या योजनाच महत्त्वाच्या ठरणार आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.