VIDEO : सहा तासानंतर अखेर बिबट्या जेरबंद

नाशिक : नाशिकच्या सावरकरनगरमध्ये आज सकाळी बिबट्यांच दर्शन झालं होते. भरदिवसा हा बिबट्या रहिवासी वस्तीत शिरल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. यामुळे तेथे भितीचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र गेल्या सहा तासांपासून सुरु असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनंतर अखेर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलं आहे. दरम्यान बिबट्याने एका वधअधिकाऱ्यावर हल्ला करत त्याला जखमी केले आहे.  सावरकरनगरमधील एका …

VIDEO : सहा तासानंतर अखेर बिबट्या जेरबंद

नाशिक : नाशिकच्या सावरकरनगरमध्ये आज सकाळी बिबट्यांच दर्शन झालं होते. भरदिवसा हा बिबट्या रहिवासी वस्तीत शिरल्याने परिसरात एकच खळबळ माजली होती. यामुळे तेथे भितीचं वातावरण निर्माण झाले होते. मात्र गेल्या सहा तासांपासून सुरु असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनंतर अखेर बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलं आहे. दरम्यान बिबट्याने एका वधअधिकाऱ्यावर हल्ला करत त्याला जखमी केले आहे. 

सावरकरनगरमधील एका सीसीटीव्हीत हा बिबट्या रहिवासी वस्तीत शिरल्याचे दिसला. यामुळे तातडीने पोलीस आणि वन अधीकारी घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र बिबट्याला जेरबंद केल्यानंतर त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली आहे. 

नुकतेच काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात आलं होतं. मात्र पुन्हा बिबट्या रहिवासी वस्तीत शिरल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातवरण निर्माण झाले आहे. मागे या परिसरात बिबट्याने अनेकांवर हल्लाही केला होता. त्या हल्ल्यात नगरसेवक संतोष गायकवाड यांच्यासह तिघेजण जखमी झाले होते.

नाशिकमधील सावरकरनगर येथील रहिवासी वस्तीत राहणाऱ्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा बिबट्या कैद झाला होता. सीसीटीव्हीमध्ये सकाळी साडे आठच्या सुमारास बिबट्या रहिवासी वस्तीत घुसल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. त्या फुटेजमध्ये बिबट्या रस्त्यावरुन पळताना दिसत आहे. मात्र सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. 

व्हिडीओ : नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत (CCTV)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *