सप्तश्रृंगीचं दर्शन घेऊन परतताना चार भाविकांचा जागीच मृत्यू

नाशिक : वणीच्या सप्तश्रृंगीच देवीचं दर्शन घेऊन परतताना रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी आहे. दरम्यान सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. नाशिकच्या वणी गडावर सप्तश्रृंगी देवीचे मंदीर आहे. या मंदिरात दर्शनासाठी 10 भाविक गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना रात्री …

, सप्तश्रृंगीचं दर्शन घेऊन परतताना चार भाविकांचा जागीच मृत्यू

नाशिक : वणीच्या सप्तश्रृंगीच देवीचं दर्शन घेऊन परतताना रात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी आहे. दरम्यान सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.

नाशिकच्या वणी गडावर सप्तश्रृंगी देवीचे मंदीर आहे. या मंदिरात दर्शनासाठी 10 भाविक गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना रात्री 12.30 च्या सुमारास वणी गावाजवळच टेम्पो आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, टेम्पोमध्ये असलेल्या 4 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पोमधील आणखी 6 भाविक जखमी झाले. सध्या वणीजवळील एका रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहे.

दरम्यान काल (19 मे) नवविवाहित जोडप्याला घेऊन ज्योतिबा दर्शनासाठी जात असताना सांगली कोल्हापूर मार्गावर भीषण अपघात घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर एका 2 वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात कोल्हापूर येथील हातकणंगले गावाजवळ घडला. अपघातात जखमी झालेले सर्वजण कर्नाटकच्या बागलकोट येथील रहिवासी आहेत.

संबंधित बातम्या : 

कोल्हापूरमध्ये भीषण अपघात, दोन वर्षीय बाळाचा जागीच मृत्यू

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *