तोतया अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

सिंधुदुर्ग : शिक्षण विभागाचा कोकण विभागीय सचिव असल्याचे भासवत फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला त्याच्या पथकासह पोलिसांनी कणकवलीत अटक केली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हा तोतया अधिकारी बनून फिरत होता. न्यायालयाने पथकातील तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो हे कशासाठी करत होता याचा तपास पोलीस घेत आहेत. 21 फेब्रुवारीपासून कोकण विभागीय सचिव असा फलक …

तोतया अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात

सिंधुदुर्ग : शिक्षण विभागाचा कोकण विभागीय सचिव असल्याचे भासवत फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या भामट्याला त्याच्या पथकासह पोलिसांनी कणकवलीत अटक केली. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हा तोतया अधिकारी बनून फिरत होता. न्यायालयाने पथकातील तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तो हे कशासाठी करत होता याचा तपास पोलीस घेत आहेत.

21 फेब्रुवारीपासून कोकण विभागीय सचिव असा फलक लावलेली आणि भारताचा झेंडा लावलेली गाडी जिल्ह्यात फिरत होती. 12 वीची परीक्षा सुरु असलेल्या केंद्रात या गाडीमधील तिघेजण जाऊन भेट द्यायचे. कसालमधील एका शाळेत हे बोगस पथक गेले असता तेथील शिक्षकांना त्यांच्या हालचालींवरुन संशय आला. मात्र, त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची स्वाक्षरी असलेलं बोगस नियुक्तीपत्र दाखवलं आणि तेथून पोबारा केला. जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये त्यांनी अशा भेटी दिल्याची तक्रार शिक्षणविभागाकडे करण्यात आली. अखेर शिक्षण विभागाने पाळत ठेवून या पथकाचा भांडाफोड केला.

या पथकाला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा तिघांकडून वेगवेगळी उत्तर मिळाली. बोगस सचिव आणि मुख्य आरोपी विजय रणसिंग, बोगस क्लार्क मयुराज शिर्के आणि चालक लक्ष्मण बंडगर या तिघांसह पोलिसांनी त्यांच्याजवळील अर्टिगा कार ताब्यात घेतली आहे. या कारवरही बोगस नंबर प्लेट लावण्यात आली होती. या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *