Video: पुराच्या पाण्यातून काढली प्रेतयात्रा; सोलापुरमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओत कंबरेच्या वर म्हणजेच जवळपास माने इतकं पाणी साचल्याचे दिसत आहे. पाण्याचा प्रवाह देखील प्रचंड वेगाने होत आहे. या पुराच्या पाण्यातुन लोक मृतदेह घेऊन जाताना दिसत आहे. पुराच्या पाण्यात बुडू नये यासाठी अनेकांनी टायरचा देखील आधार घेतल्याचे दिसत आहे.

Video: पुराच्या पाण्यातून काढली प्रेतयात्रा; सोलापुरमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Aug 09, 2022 | 4:18 PM

सोलापूर : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. त्यातच सोलापुरात देखील धो धो पाऊस कोसळत आहे. मात्र याच पावसामुळे प्रशासनाची पोलखोल करणारा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोलापुरमधील(solapur) अक्कलकोट तालुक्यात पुराच्या पाण्यातून(flood waters) प्रेतयात्रा(Funeral ) काढण्यात आली आहे. पूल नसल्यामुळे येथील नागरिकांची मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पुराच्या पाण्यातुनच नागरीकांना वाट काढावी लागतेय.

अक्कलकोट तालुक्यातील पितापूर गावातील हे विदारक दृष्य आहे. या गावात पूल नसल्यामुळे ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यातून अंतयात्रा काढली आहे. या प्रेत यात्रेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

पुराच्या पाण्यात बुडू नये यासाठी अनेकांनी घेतला टायरचा आधार

या व्हिडिओत कंबरेच्या वर म्हणजेच जवळपास माने इतकं पाणी साचल्याचे दिसत आहे. पाण्याचा प्रवाह देखील प्रचंड वेगाने होत आहे. या पुराच्या पाण्यातुन लोक मृतदेह घेऊन जाताना दिसत आहेत. पुराच्या पाण्यात बुडू नये यासाठी अनेकांनी टायरचा देखील आधार घेतल्याचे दिसत आहे.

मृतदेह प्लास्टिकने कव्हर करण्यात आला

मृतदेह खांद्याच्यावर उचलून हे लोक पुराच्या पाण्यातून वाट काढताना दिसत आहेत. मृतदेह प्लास्टिकने कव्हर करण्यात आला आहे. या गावात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या गावातुन पलीकडे जाण्यासाठी कोणताही पुल बांधण्यात आलेला नाही. यामुळे पावसाळ्यात येथील नागरीकांची मोठी गैरसोय होते. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्स साजरा होत आहे. ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ हा कार्यक्रम सरकार राबवत आहे. त्यातच येथे गावात धड रस्तेच नाहीत तर घरापर्यंत तिरंगा कसा पोहचवणार असा प्रश्न हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपस्थित होत आहे. अनेकांना मृत्यूनंतरी हाल सोसावे लागत असल्याचे भीषण वास्तव या व्हिडिओमुळे समोर आले आहे.

सोलापुरात ढगफुटीसदृश्य पाऊस

मागील आठवड्य़ातच सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यात बोरगाव येथे ढगफुटी सदृश्य पाऊस (Heavy Rain) झाला . त्यामुळे बोरगावातील (Borgaon) अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. दुष्काळी तालुका अशी ओळख असलेल्या अक्कलकोटमध्ये (Akkalkot) ढगफुटी सदृश पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दोन तास झालेल्या पावसाने बोरगावच्या आसपासच्या अनेक ओढ्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे कुरनूर धरणातून 600 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. आश्लेषा नक्षत्राच्या दमदार पावसाने अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव, घोळसगाव, किणीवाडी, काझी, कणबस, बादोले यासह आदी गावात पावसाने थैमान घातले असून शेतीपिकांचे मोठे नुकसान केले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.