कुत्र्यांवर खरुज रोगाचं थैमान, संसर्गजन्य रोगामुळे माणसांनाही लागण

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील वारा जहांगीर येथे गेल्या काही महिन्यापासून कुत्र्यांना खरुज (Fungale Diseases) या रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या जीवावर उठलेल्या या रोगाची बाधा नागरिकांनाही होत असून खाज सुटलेल्या रुग्णांची संख्यात वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन लागण झालेल्या कुत्र्यांवर वेळीच उपचार करुन उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे. वाशिम जिल्ह्यातील वारा …

कुत्र्यांवर खरुज रोगाचं थैमान, संसर्गजन्य रोगामुळे माणसांनाही लागण

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील वारा जहांगीर येथे गेल्या काही महिन्यापासून कुत्र्यांना खरुज (Fungale Diseases) या रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या जीवावर उठलेल्या या रोगाची बाधा नागरिकांनाही होत असून खाज सुटलेल्या रुग्णांची संख्यात वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन लागण झालेल्या कुत्र्यांवर वेळीच उपचार करुन उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे.

वाशिम जिल्ह्यातील वारा जहागीर या गावात मागील अनेक दिवसांपासून भटक्या कुत्र्यांवर खरुज रोगाने थैमान घातले आहे. या रोगामुळे अंगावरील केस गळून जात असून त्वचा लालसर,काळसर व कोरडी पडत आहे. गावातील शेकडो भटके कुत्रे जागोजागी दिसून येत आहेत. हा रोग संसर्गजन्य असल्याने नागरिकांना या रोगाची लागण होत आहे. आतापर्यंत अनेक जणांना याची बाधा झाली असून काही वयोवृद्धांना त्वचारोगामुळे गंभीर आजाराला सामोरे जावे लागत असल्याचं नागरिक सांगत आहेत.

वारा जाहिगीर इथून उपचारासाठी वाशिमला जावं लागत आहे. गोरगरिबांना परिस्थितीनुसार कठीण होत असल्यामुळे गावातील नागरिकांच्या या समस्यांकडे प्रशासनाने लक्ष्य देऊन गावातील असलेलं उपकेंद्र सुरु करुन उपचाराची सुविधा करावी अशी मागणी सरपंचांनी केली आहे.

वारा जहागीर या गावात मागील दोन महिन्यांपासून कुत्र्यांना खरुज या रोगाची लागण झाली आहे. या भयानक रोगांमुळे अनेक भटके कुत्रे मृत्यूमुखी पडले आहेत. खाजेमुळे हैराण झालेले आणि त्वचेवर ठिकठिकाणी जखमी झालेले कुत्रे घरामध्ये घुसण्याचा, पाण्यात, डोहात बुडून बसण्याचा प्रयत्न करीत आहेत. या कुत्र्यांच्या खरुज रोगाची बाधा नागरिकांना होत असल्याने अंगाला खाज सुटलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष देऊन या बाधित कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *