गडचिरोलीत दुपारी तीनपर्यंत 57 टक्के मतदान

Gadchiroli Chimur lok sabha : गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूक 2019 साठी मतदान पार पडलं. नक्षलग्रस्त गडचिरोलीत सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. दुपारी तीनपर्यंत 57 टक्के मतदानाची नोंद झाली. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. यात चार विधानसभा अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भाग आहेत. अहेरी, आरमोरी, गडचिरोली आणि आमगाव या चार विधानसभा रेड झोनमध्ये […]

गडचिरोलीत दुपारी तीनपर्यंत 57 टक्के मतदान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

Gadchiroli Chimur lok sabha : गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणूक 2019 साठी मतदान पार पडलं. नक्षलग्रस्त गडचिरोलीत सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. दुपारी तीनपर्यंत 57 टक्के मतदानाची नोंद झाली. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र येतात. यात चार विधानसभा अतिसंवेदनशील आणि नक्षलग्रस्त भाग आहेत. अहेरी, आरमोरी, गडचिरोली आणि आमगाव या चार विधानसभा रेड झोनमध्ये येतात. तर चिमूर आणि ब्रह्मपुरी साधारण भाग आहे.

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात पाच उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी महत्त्वाची लढत म्हणजे काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे. शिवाय बसपानेही इथे उमेदवार दिला आहे. या लोकसभा मतदारसंघात 15 लाख 68 हजार 620 मतदार आहेत.

गडचिरोलीत भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते, काँग्रेसकडून नामदेव उसेंडी आणि वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. रमेश गजबे रिंगणात आहेत.

प्रत्येक मतदारांनी मतदान करावे यासाठी डॉ. अभय बंग यांच्या संस्थेमार्फत दारु पिऊन मतदान करु नये असे बॅनर आणि पत्रके ठिकठिकाणी लावण्यात आली होती.

  • अशोक नेते – भाजप
  • नामदेव उसेंडी – काँग्रेस
  • डॉ. रमेश गजबे – वंचित बहुजन आघाडी

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलग्रस्त प्रभाव असल्यामुळे मतदानाची वेळ निवडणूक आयोगाने सात ते तीन ठेवली. पण ही वेळ साडेचार ते पाच वाजेपर्यंत करावी अशी मागणी स्थानिक मतदारांनी केली.  पण ती वेळ वाढवली नाही.

3 मतदारांचा अपघाती मृत्यू

गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मतदानासाठी निघालेल्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तर तीन जण जखमी झाले. चालकाचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. मतदान करुन परत जात असताना हा अपघात झाला.

मीच पुन्हा खासदार : अशोक नेते

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मीच पुन्हा खासदार होणार असा दावा भाजपचे उमेदवार अशोक नेते यांनी केला. “मतदारसंघात रेकॉर्ड करणाऱ्या मतदानात मलाच 50 टक्याहून अधिक मत मिळणार आहेत. भाजप सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची पोचपावती भरघोस मतदानातून मिळणार आहे. निवडणूक झाली आहे, आता विजय साजरा करण्यासाठी तयारी करावी लागणार आहे”, असं अशोक नेते म्हणाले.

डॉ नामदेव उसेंडींना विजयाचा विश्वास  

गडचिरोली चिमूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ नामदेव उसेंडी यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केलं. भाजप सरकारच्या योजनांवर मतदारांची नाराजी आहे. मतदार काँग्रेसच्या मागे उभा राहील असा विश्वास डॉ नामदेव उसेंडी यांनी व्यक्त केला.

नवरदेवाचं मतदान

भंडारा जिल्ह्याच्या लाखंदूर तालुक्यातील इंदौरा येथील नवरदेवाने लग्नापूर्वी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावला. लाखंदुर तालुक्यातील इंदौरा येथील नवरदेव पितांबर जेंगठे याचा आज विवाह  गडचिरोली येथील सावंगी गावात होता. त्यांची वरात आधी इंदौरा येथील मतदान केंद्रावर वळवली. सुरुवातीला मतदान केंद्र गाठत मतदान केले आणि नंतर तो आपल्या लग्नस्थळी रवाना झाला. वाजतगाजत नवरदेव मतदान केंद्रावर येत असल्याने, त्याला बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती.

डॉ. अभय आणि राणी बंग यांचं मतदान

गडचिरोली : येथील ज्येष्ठ समाजसेवक महाराष्ट्र भूषण, पद्मश्री डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांनी धानोरा तालुक्यातील चातगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. दुर्गम क्षेत्र असूनही इथं मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचं चित्र बघायला मिळालं. बंग दाम्पत्यानं याच रांगेत मतदानाचा हक्क बजावला. डॉ. बंग यांनी या जिल्ह्यात दारूमुक्त निवडणुकीसाठी अभियान सुरू केलं होतं. त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी प्रबोधनपर उपक्रम राबवले. चातगाव केंद्रावर मतदानासाठी झालेली गर्दी बघून त्यांनी समाधान व्यक्त केला आणि प्रत्येकानं मतदान करावं, असं आवाहन या दाम्पत्यानं केलं.

व्हीव्हीपॅटचं स्वागत

निवडणूक आयोगाने यावेळी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅटची सुविधा उपलब्ध केली. मतदारांना मतदान केल्यानंतर आपल्या दिलेल्या मताची खात्री करता येते. यामुळे या व्हीव्हीपॅट सुविधेचं मतदारांनी स्वागत  केलं.

निवडणुकीच्या तारखा

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.