राजकारण्यांनी अन्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये : गडकरी

यवतमाळ : ‘राजकारण म्हणजे सत्ताकारण असं नाही, राजकारण याचा अर्थ समाजकारण आणि विकासकारण असा आहे. मात्र, दुर्देव असं की, आपल्याकडे सत्ताकारण म्हणजेच राजकारण झालंय’, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. यवतमाळ येथे घेण्यात येत असलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा निरोप समारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. …

राजकारण्यांनी अन्य क्षेत्रात हस्तक्षेप करू नये : गडकरी

यवतमाळ : ‘राजकारण म्हणजे सत्ताकारण असं नाही, राजकारण याचा अर्थ समाजकारण आणि विकासकारण असा आहे. मात्र, दुर्देव असं की, आपल्याकडे सत्ताकारण म्हणजेच राजकारण झालंय’, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. यवतमाळ येथे घेण्यात येत असलेल्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा निरोप समारंभ आज पार पडला. या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. पुढे गडकरी म्हणाले की, ‘सगळ्याच पक्षात चांगली लोक आली तर चांगलच आहे, राजकारणाला काही मर्यादा आहेत, त्यामुळे राजकारणींनी इतर क्षेत्रात हस्तक्षेप करू नये.’

संमेलनाच्या उद्घाटनाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची पत्नी वैशाली येडे यांना बोलावण्याचा निर्णय अतिशय उत्तम होता, असल्याचंही गडकरी म्हणाले.

‘भारतीय संस्कृती ही मुल्याधिष्टीत शिक्षणपद्धती आहे. साहित्याचे आपल्या आयुष्यातील स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. सत्ता, संपत्ती, मान, सन्मान हे सगळं खोट आहे. जेवढ जगायचं आहे त्यासाठी विचाराची प्रेरणा लागते, जीवन जगण्याची प्रेरणा नाटकाच्या माध्यमातून, कवितेच्या माध्यमातून समाज माणसापर्यंत पोहचत असते. आपल्याकडे साहित्यिकांनी दिलेला प्रगल्भ दृष्टीकोन आहे. जीवन उत्तम पद्धतीने जगायचे असेल तर साहित्य हे महत्त्वाचे आहे’, असेही गडकरी म्हणाले.

‘समाजासाठी राजकारणांची, साहित्याकांची, पत्रकारांची सर्वांची भूमिका महत्वाची आहे. आपल्या देशात भिन्नतेपेक्षा विचार शुन्यताच जास्त आहे, असं म्हणाव लागेल. प्रत्येक क्षेत्रात काळानुसार बदल करावा लागतो. जे चांगलं असेल ते-ते आम्ही स्विकारु आणि टाकाऊ गोष्टी नाकारु’, असे गडकरींनी स्पष्ट केले.

‘आज जगातील मोठ्या प्रमाणावर लोकं आपल्याकडे आशेनं बघत आहेत, 21 वे शतक भारतीय संस्कृतीचे असेल’, असे गडकरी या प्रसंगी म्हणाले.

‘हे संमेलन सर्वांच्या सहभागातून अतिशय यशस्वी झालं. त्यासाठी सर्वांचे मनापासून अभिनंदन. एखादी गोष्ट यशस्वी व्हायची असेल तर त्यात सर्वांचा सहभाग लागतो’, असे मत गडकरींनी व्यक्त केलं. ‘एवढे मोठे साहित्यिक इथे आहेत. मला तुमच्याकडून शिकता येईल, म्हणून मी या ठिकाणी आलो. मतभिन्नता असली तरी हरकत नाही पण मनभेद नको’, असेही गडकरी म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *