वायकर जिंकले काय अन् हरले काय? माझा काय दोष?; कीर्तिकर यांचं धक्कादायक विधान

अमोल लढत असल्यामुळे तुमचा कुणाला पाठिंबा असं मला विचारलं जात होतं. मी वायकरांच्या बाजूने आहे हेच मी वारंवार सांगत होतो. अमोलच्या विरोधात आहे हे सुद्धा सांगत होतो. वायकरांसाठीच्या जेवढ्या सभा झाल्या, मेळावा झाला, समन्वय समितीच्या बैठकीलाही मी उपस्थित होतो. मला कोल्हापूर, नाशिकमध्येही प्रचार करावा लागला. पुन्हा आल्यावर मी वायकरांचा प्रचार केला, असं गजानन कीर्तिकर यांनी सांगितलं.

वायकर जिंकले काय अन् हरले काय? माझा काय दोष?; कीर्तिकर यांचं धक्कादायक विधान
Gajanan Kirtikar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 6:40 PM

गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीचे लाचार व्हायचे आहे. त्यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी शिंदे गटाचे नेते शिशीर शिंदे यांनी केली आहे. शिंदे यांच्या या मागणीनंतर शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी मीडियाशी संवाद साधत आपली बाजू मांडली. मी पक्षविरोधी असं काही केलं नाही. माझं जे काही म्हणणं आहे, ते मी आमच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडणार आहे, असं सांगतानाच रवींद्र वायकर जिंकले काय आणि हरले काय? त्या माझा काय दोष? असा सवाल गजानन कीर्तिकर यांनी केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

रवींद्र वायकर हरले तर त्याचा दोष तुमच्याकडे जाणार नाही का? असा सवाल गजानन कीर्तिकर यांना करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना त्यांनी हे धक्कादायक उत्तर दिलं. वायकर समजा जिंकले काय? आणि हरले काय? माझा काय दोष? काय दोष आहे? अनेक ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील आणि पडतील. त्या प्रत्येक ठिकाणी कुणाला ना कुणाला दोष देणार का? असा दोष कुणाला देता येत नाही. राजकीय परिस्थितीनुसार निर्णय होतात. मतदार जे ठरवतो ते होत असतं. इथे हार आणि जीतचा प्रश्न येतो कुठे? प्रेस्टिजचा प्रश्न येतो कुठे?, असा सवाल गजानन कीर्तिकर यांनी केला.

मुलगा जिंकला तर आनंदच

अमोल कीर्तिकर जिंकले तर वडील म्हणून काय वाटेल? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर, मुलगा जिंकला तर नक्कीच आवडेल. अमोलचं जाऊ द्या. 48 ठिकाणी कोणी तरी जिंकणार, कोण तरी हरणार आहे. त्यात कुणाला आनंद होणार तर कुणाला वाईट वाटणार आहे, असंही कीर्तिकर म्हणाले.

तसे लढले नाही

मावळला मी चार पाच दिवस होतो. पार्थ पवार जेव्हा निवडणुकीला उभा होता तेव्हा अजित पवार गटाचे कार्यकर्ते ज्या जोमाने निवडणूक लढत होते, तसं लढताना आता दिसले नाही. त्यामुळे अजितदादा गटावर आरोप झाला असावा. तेव्हा त्यांचा उमेदवार होता. त्यांच्या उमेदवारांना रन करण्यासाठी ते जोरात कामाला होते. तेवढे कदाचित यावेळी नसतील, असं त्यांनी सांगितलं.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.