Ganesh Visarjan Live Update | महाराष्ट्रभरातील विविध गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

महाराष्ट्रात विविध ठिकाणी गणपती विसर्जनासाठी (GaneshVasarjan) गणपती बाप्पा मार्गस्थ झाले आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो गणेशभक्तांचा जनसागर उसळताना दिसत आहे.

Ganesh Visarjan Live Update | महाराष्ट्रभरातील विविध गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

मुंबई : महाराष्ट्रात विविध ठिकाणी गणपती विसर्जनासाठी (GaneshVasarjan) गणपती बाप्पा मार्गस्थ झाले आहेत. अनंत चतुर्दशीनिमित्त (Anant Chaturdashi 2019) लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी लाखो गणेशभक्तांचा जनसागर उसळताना दिसत आहे. राज्यभरात समुद्र किनारे, नद्या-तलाव तसंच कृत्रिम तलावांजवळ गणपती बाप्पांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठीही मोठी गर्दी उसळणार आहे. मागील 11 दिवस गणपती बाप्पांनी (Ganpati Bappa) गणेशभक्तांच्या आयुष्यात नवचैतन्य आणलं होतं. अखेर त्याला निरोप देण्याचा दिवस आल्याने अनेकजण भावूकही होत आहेत.

गणपती विसर्जन मिरवणूक लाईव्ह अपडेट (GaneshUtsav2019)

Picture

औरंगाबादमधील मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ

औरंगाबादमधील मुख्य मिरवणुकीला ग्रामदैवत श्री संस्थान मानाचा गणपती मंदिर ट्रस्ट आणि गणेश महासंघाच्या आरतीनं सुरुवात, राजा बाजार येथून मिरवणूक मार्गस्थ, गोदावरी नदीत विसर्जन होणार

12/09/2019,4:51PM
Picture

कराड: कोयना नदीत गणपती विसर्जनादरम्यान तरुण बुडाला

कराडमधील कोयना नदीत गणपती विसर्जनादरम्यान तरुण बुडाला, आगाशिवनगर येथे गणपती दुर्घटना, पोलिसांकडून शोधमोहिम सुरू, चेतन काका शिंदे असं 22 वर्षीय तरुणाचं नाव

12/09/2019,12:56PM
Picture

जळगावमध्ये बाप्पाच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर 55 पोत्यांची रांगोळी

12/09/2019,12:21PM
Picture

कोल्हापूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून ढोल वादन

कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकांची रेलचेल, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून ढोल वादन, गणेशभक्तांचा ढोलाच्या तालावर ठेका

12/09/2019,12:05PM
Picture

वाशिममध्ये गणेश विसर्जन सुरू

वाशिममध्ये गणेश विसर्जन सुरू, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी आणि नगराध्यक्ष अशोक हेडा यांनी ढोल वाजवून ठेका धरला, गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणीत

12/09/2019,11:17AM
Picture

वाहतूक पोलिसांचाही ढोल ताशावर ठेका

12/09/2019,11:16PM
Picture

जळगावमध्ये पिंप्राळा येथील प्रयास मंडळ गणपती विसर्जन मिरवणूक पोलिसांनी अडविली

जळगावमध्ये पिंप्राळा येथील प्रयास मंडळ गणपती विसर्जन मिरवणूक पोलिसांनी अडविली, परवानगी घेतली नसल्यानं कारवाई, मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून निषेध म्हणून महामार्गावर ठिय्या, महामार्गावर वाहतूक ठप्प

12/09/2019,10:42AM
Picture

घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात

12/09/2019,10:57AM
Picture

नागपूरच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

नागपूरातील मानाचा गणपती नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली…

12/09/2019,10:33AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *