बस स्टॉपवर विद्यार्थिनींची सेल्फीसाठी झुंबड, अजित पवार म्हणतात….

बारामतीच्या बसस्थानकावर गेल्यानंतर काही विद्यार्थिनींनी अजितदादांना फोटोसाठी आग्रह केला. पण, अजित पवार यांनी 'फोटो राहू द्या, तुमच्या अडचणी असतील तर सांगा', असं म्हणत त्या विद्यार्थिनींशी संवाद साधला.

बस स्टॉपवर विद्यार्थिनींची सेल्फीसाठी झुंबड, अजित पवार म्हणतात....
Follow us
| Updated on: Jan 18, 2020 | 1:27 PM

बारामती :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीतील विविध विकासकामांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये प्रत्येक कामाबाबत लागलीच निर्णयही घेतले. दरम्यान, बारामतीच्या बसस्थानकावर गेल्यानंतर काही विद्यार्थिनींनी अजितदादांना फोटोसाठी आग्रह केला. पण, अजित पवार यांनी ‘फोटो राहू द्या, तुमच्या अडचणी असतील तर सांगा’, असं म्हणत त्या विद्यार्थिनींशी संवाद साधला. अजित पवारांनी त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आणि लागलीच त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

बारामती शहरातील पोलीस वसाहत, बसस्थानक, एसटी कर्मचारी वसाहत, पंचायत समिती, एसटी कार्यशाळा आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांची पाहणी करत अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सूचनाही दिल्या. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नवीन वसाहत उभारणी, एसटी कर्मचारी वसाहत दुरुस्ती, पंचायत समिती नूतन इमारत बांधकाम, एसटी कार्यशाळा दुरुस्ती, वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसराचे सुशोभीकरण अशा विविध कामांबाबत अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

या दौऱ्यादरम्यान बसस्थानकावर महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी अजित पवार यांना फोटोसाठी आग्रह केला. मात्र अजित पवार यांनी ‘फोटो राहू द्या, तुमच्या काही अडचणी असतील तर सांगा’, असे म्हणत संबंधित विद्यार्थीनींशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थीनींनी वेगवेगळ्या मार्गावरील बसेस वाढवण्याची, तसेच इतरही अनेक समस्या सांगितल्या. त्यावर अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत तातडीने या विषयांवर उपाययोजना करण्याचा आदेश दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या पाच वर्षात विरोधी बाकांवर बसावे लागले. मात्र महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्यासह उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. मागील पाच वर्षात बारामतीला विविध विकासकामांसाठी निधीची कमतरता भासली. मात्र आता राज्याची तिजोरीच हाती आल्याने अजित पवार यांनी शहरातील कामांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.