'मोदी-शहांना हटवा, गडकरींना निवडा', भाजपमध्येच मोर्चेबांधणी

नागपूर: पाच राज्याच्या निवडणुकीतील पराभवानंतर आता भाजपमध्ये मोदीविरोध वाढत चालला आहे. कारण उत्तर प्रदेशात ‘योगी फॉर पीएम’चे पोस्टर्स लागल्यानंतर, आता महाराष्ट्रातून आणि संघाची मुख्यालय असलेल्या नागपुरातून नवी मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवा, अशी मागणी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. त्याबाबतचं पत्र तिवारी यांनी मोहन भागवत …

'मोदी-शहांना हटवा, गडकरींना निवडा', भाजपमध्येच मोर्चेबांधणी

नागपूर: पाच राज्याच्या निवडणुकीतील पराभवानंतर आता भाजपमध्ये मोदीविरोध वाढत चालला आहे. कारण उत्तर प्रदेशात ‘योगी फॉर पीएम’चे पोस्टर्स लागल्यानंतर, आता महाराष्ट्रातून आणि संघाची मुख्यालय असलेल्या नागपुरातून नवी मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवा, अशी मागणी शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे. त्याबाबतचं पत्र तिवारी यांनी मोहन भागवत यांना पत्र पाठवलं आहे.

“पाच राज्यात भाजपच्या पराभवानंतर आता पक्षाचं नेतृत्त्व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे द्या, हीच काळाची गरज आहे”, असं किशोर तिवारी यांनी संघप्रमुख मोहन भागवत यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

विदर्भाचे शेतकरी आणि आदिवासी चळवळीचे कार्यकर्ते किशोर तिवारी यांनी संघप्रमुखांना विनंती केली आहे. लोकसभेच्या 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षाचे नेतृत्व पुन्हा एकदा सर्वसमावेशक आणि देशाला सर्व क्षेत्रात विकासाकडे नेण्याकरिता, सर्व वर्गाच्या जनतेमध्ये विश्वासाचे आणि भयमुक्त वातावरण निर्मितीसाठी, पक्षातील संघ परिवारातील मवाळ नेते नितीन गडकरी यांच्याकडे द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लाट ओसरली, मोदी नव्हे ‘योगी फॉर पीएम’चे फलक झळकले!

यापूर्वी उत्तर प्रदेशात योगी फॉर पीएम अर्थात पंतप्रधानपदासाठी योगी आदित्यनाथ यांना उमेदवारी द्या असे फलक लावण्यात आले होते. एका बाजूला मोदी आणि दुसऱ्या बाजूला योगी आदित्यनाथ यांचा फोटो लावण्यात आला आहे. या होर्डिंगच्या वरील बाजूला योगी फॉर पीएम #Yogi4PM, योगी लाओ देश बचाओ असं लिहिण्यात आलं आहे. तर मोदींच्या फोटोखाली ‘जुमलेबाजी का नाम मोदी’ विरुद्ध योगींच्या फोटोखाली ‘हिंदुत्व का ब्रांड योगी’ असं लिहिलं आहे.

संबंधित बातम्या 

लाट ओसरली, मोदी नव्हे ‘योगी फॉर पीएम’चे फलक झळकले! 

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *