Video| ‘गोकुळ’ आता नौदलाला करणार दुधाचा पुरवठा; 22 हजार लिटरची पहिली खेप रवाना

Video| 'गोकुळ' आता नौदलाला करणार दुधाचा पुरवठा; 22 हजार लिटरची पहिली खेप रवाना

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे दूध आता नौदलातील सैन्यांना मिळणार आहे. सिलेक्ट टेट्रापॅक दूध भारतीय नौदल सेनेला पुरवठा करण्याचा करार करण्यात आला आहे. या करारानुसार आता नौदलाला दुधाचा पुरवठा करण्यात येईल.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 10, 2021 | 8:38 AM


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचे दूध आता नौदलातील सैन्यांना मिळणार आहे. सिलेक्ट टेट्रापॅक दूध भारतीय नौदल सेनेला पुरवठा करण्याचा करार करण्यात आला आहे. या करारानुसार आता नौदलाला दुधाचा पुरवठा करण्यात येईल. दरम्यान आज टेट्रापॅक दुधाची 22 हजार लिटरची पहिली फेरी कारवारला पाठवण्यात आली आहे. या टेट्रापॅक दुधाचे वैशिष्ट म्हणजे हे सामान्य तापमानात 180 दिवस खराब होत नाही. यामुळे भारतीय नौदलातील जवानांना आता सहज दूध उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे.

उच्च तंत्रज्ञानाचा वापर

उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिलेक्ट टेट्रापॅक दुधाची निर्मिती गोकुळच्या वतीने करण्यात आली आहे. या दुधाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे हे दूध सामान्य तापमानामध्ये 180 दिवस चांगले राहाते. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे टेट्रापॅक हे नवीन उत्पादन आहे. हे दूध दीर्घकाळ चांगले राहात असल्य़ामुळे नौदलाला दुधाचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसा गोकुळसोबत करार झाला असून, आज 22 हजार लिटर दुधाची पहिली फेरी कर्नाटकच्या कारवारला रवाना झाली आहे.

अडीच लाख लिटरपेक्षा अधिक दुधाचा पुरवठा

तब्बल दोन लाख 67 हजार लीटर दूध पुरवठ्याचा गोकुळसोबत करार करण्यात आला  आहे. या करारानुसार पहिली दुधाची खेप आज रवाना झाली. टेट्रापॅक दूध दीर्घकाळ टीकणारे आहे. सामान्य तापमानाला 180 दिवस चांगले राहु शकते. यामुळे जवानांना वेळेत दूध मिळेल, याचा संपूर्ण गोकुळ परिवाराला आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली आहे. तसेच गोकुळच्या प्रगतीमध्ये दूध उत्पादक, वितरक आणि हितचिंतकाचे मोठे योगदान असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

Farmers Protest Called off : दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित, 15 जानेवारीला पुन्हा बैठक

Helicopter crash: राऊतांची शंका अनेकांच्या मनात! अपघाताची कारणं देशाला कळावी, मंत्री विजय वडेट्टीवार यांची मागणी

Omicron : डेल्टा व्हेरिएंट आणि ओमिक्रॉनची काय स्थिती? काय म्हटलं मुंबई महापालिकेनं? वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें