NashikGold: 24 कॅरेट सोनं 48 हजार 450 रुपयांवर

नाशिकच्या सराफा बाजारपेठेमध्ये रविवारी सोने आणि चांदीचे दर स्थिर होते. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 450 रुपये नोंदवले गेले.

NashikGold: 24 कॅरेट सोनं 48 हजार 450 रुपयांवर
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 1:04 PM

नाशिकः नाशिकच्या सराफा बाजारपेठेमध्ये रविवारी सोने आणि चांदीचे दर स्थिर होते. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 450 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 75 रुपये नोंदवले गेले.

नाशिकच्या सराफा बाजारात वसुबारसेच्या दिवशी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48000 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46500 रुपये नोंदवले, तर चांदीचे दर किलोमागे 65000 रुपये नोंदवले गेले. धनत्रयोदशी दिवशी मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 200 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46 हजार 900 रुपये आणि चांदीचे दर किलोमागे 65 हजार 500 रुपये नोंदवले गेले. बुधवारी सोन्याचे भाव जवळपास 700 रुपयांनी स्वस्त झाले. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47 हजार 500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46 हजार 300 रुपये नोंदवले गेले. चांदीमध्ये जवळपास दोन हजारांनी घसरण झाली. किलोमागे चांदीचे दर 63 हजार 500 रुपये नोंदवले गेले. गुरुवारीही सोने-चांदी स्वस्त होते. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47 हजार 500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार रुपये नोंदवले गेले, चांदीचे दर किलोमागे 64000 रुपये नोंदवले गेले. शुक्रवारी या दरात वाढ झाली. 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48000 रुपये नोंदवले गेले. 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 400 तर चांदीचे दर किलोमागे 67000 रुपये नोंदवले गेले. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48 हजार 450 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46 हजार 75 रुपये नोंदवले गेले, तर चांदीचे दर किलोमागे 67 हजार रुपये होते आणि रविवारीही हेच दर कायम आहेत, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली.

भाव वाढण्याचा अंदाज

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Gold and silver prices stable in Nashik bullion market)

इतर बातम्याः

शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांवर नाशिकमध्ये चॉपरने हल्ला; जखमींची प्रकृती चिंताजनक

100 टक्के लसीकरणासाठी 30 नोव्हेंबरची डेडलाईन; नाशिक विभागातल्या मोहिमेला पुन्हा गती!

Non Stop LIVE Update
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.