100 रुपयांसाठी मित्राची डोक्यात लोखंडी सळई घालून हत्या

गोंदिया : 100 रुपयांच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची घटना गोंदियात घडली. हे दोन्ही मित्र मालवाहक ऑटो चालक होते. अवघ्या 100 रुपयांच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. चिराग शेंडे (25 वर्ष) असं मृत ऑटोचालकाचं नाव आहे. तर या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय सहारे (32 वर्ष) याला …

100 रुपयांसाठी मित्राची डोक्यात लोखंडी सळई घालून हत्या

गोंदिया : 100 रुपयांच्या वादातून एका मित्राने दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची घटना गोंदियात घडली. हे दोन्ही मित्र मालवाहक ऑटो चालक होते. अवघ्या 100 रुपयांच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली. चिराग शेंडे (25 वर्ष) असं मृत ऑटोचालकाचं नाव आहे. तर या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी विजय सहारे (32 वर्ष) याला अटक केली आहे.

गोंदिया शहरातील महाराणा प्रताप चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ मालवाहक गाड्यांचं ऑटो स्टँड आहे. आरोपी विजय सहारे आणि मृत चिराग शेंडे हे दोघेही येथेच आपले मालवाहक ऑटो लावायचे. हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. दिवाळीत चिरागने विजयला 500 रुपये व्याजाने दिले होते. विजयने व्याजासह 560 रुपये चिरागला परत केले. मात्र व्याजाचे आणखी 100 रुपये देण्यासाठी चिरागने विजयकडे तगादा लावला होता.

पैसे देऊनही विजय त्रास देत असल्याने चिराग संतापला होता. शनिवारी सायंकाळी या दोघांमधील वाद विकोपाला गेला, त्यानंतर रागाच्या भरात विजयने आपल्या ऑटोतील लोखंडी सळई काढली आणि त्या सळईने चिरागच्या डोक्यात वार केले. या हल्ल्यात चिराग गंभीर जखमी झाला, त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. यानंतर विजयने घटनास्थळावरुन पळ काढला.

पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी तपासाची चक्रे तीव्र गतीने फिरवत फरार आरोपी विजय सहारे याला घटनेच्या दोन तासाच्या आत अटक केली. 100 रूपयांसाठी चिराग सतत त्रास देत असल्याने आपण त्याची हत्या केल्याची कबुली आरोपी विजयने दिली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *