अवैध दारू साठ्यावर पोलिसांचा छापा; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यातील चिरेखनी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये हातभट्टी दारूच्या साठ्यासह 2 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार झाला आहे.

अवैध दारू साठ्यावर पोलिसांचा छापा; 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अजय देशपांडे

Dec 19, 2021 | 11:18 AM

गोंदिया : जिल्ह्यातील चिरेखनी परिसरात पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामध्ये हातभट्टी दारूच्या साठ्यासह 2 लाख 12 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार झाला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. चिरेखनी परिसरात मोहाच्या फुलांपासून अवैध पद्धतीने दारू निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाली होती. सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

दारूसाठा जप्त

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चिरेखनी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोहाच्या फुलांपासून अवैध पद्धतीने दारू निर्मिती सुरू हेती. याची माहिती पोलिसांन मिळाली, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. या छाप्यामध्ये मोठा दारूसाठा  जप्त करण्यात आला आहे.

फरार आरोपीचा शोध सुरू

दरम्यान पोलिसांचा  छापा पडल्याचे लक्षात येताच घटनास्थळावरून आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यातील दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अन्य एक आरोपी फरार झाला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.  घटनास्थळावरून दारू साठ्यासह दारू निर्मितीसाठी लागणारे सामान जप्त करण्यात आले आहे. या सर्व सामानाची एकूण किंमत अंदाजे 2 लाख 12 हजार रुपयांपर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या 

Nashik | अंधेर नगरी चौपट राजा…गैरकारभाराचे बिंग फोडले म्हणून नाशिकमध्ये महिला वकिलावर भरदिवसा पेट्रोलहल्ला

नाशिक महापालिकेची प्रभागरचना फुटल्याचा आरोप; नगरसेवकाच्या घरात बसून स्वकियांचाही करेक्ट कार्यक्रम

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें