धक्कादायक! शाळेतील पोषण आहारातच सापडला गुटखा आणि कचरा; या जिल्ह्यात खळबळ, शिक्षणाधिकार म्हणतात अहवालानंतर कारवाई करु

शाळेत दिला जाणारा जो पोषण आहार आहे त्यामध्ये गुटख्याची पाकिटं, धूळ, सिमेंट असे आरोग्याला अपायकारक असणारे घटक विद्यार्थ्यांच्या आहारात सापडल्याने पालकवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

धक्कादायक! शाळेतील पोषण आहारातच सापडला गुटखा आणि कचरा; या जिल्ह्यात खळबळ, शिक्षणाधिकार म्हणतात अहवालानंतर कारवाई करु
School nutrition dietImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 15, 2022 | 9:19 PM

गोंदिया: गोंदियातील चंगेरी येथील जिल्हा परीषदेच्या शाळेमध्ये (Primary School ) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी (Student) पुरविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारामध्ये (School nutrition diet) सिमेंट, गुटखा, कचरा आणि धूळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या या पोषाण आहारात अशा प्रकाराच्या जीवाला धोका असणाऱ्या वस्तू जर आहारात सापडत असतील तर संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणीने आता जोर धरला आहे.

चंगेरी शाळेतील पोषण आहाराविषयी साशंकता येत असल्याने सामाजिक कार्यकर्ते केतन तुरकर यांनी शाळेला भेट देत पोषण आहाराची पाहणी केली. ही पाहणी करत असताना शाळेच्या पोषण आहार अधीक्षकांनाही शाळेत पाचारण करण्यात आले. त्यांच्यासमोरच या पोषण आहाराच्या निकृष्ट धान्याचा पंचनामा करण्यात आला. त्यानंतर शाळेत दिला जाणारा जो पोषण आहार आहे त्यामध्ये गुटख्याची पाकिटं, धूळ, सिमेंट असे आरोग्याला अपायकारक असणारे घटक विद्यार्थ्यांच्या आहारात सापडल्याने पालकवर्गातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कडक कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते केतन तुरकर यांनी केली आहे.

संबंधितांवर कारवाई होणार का?

शालेय पोषण आहाराचे कंत्राट श्रीहरी राईस अँड अ‍ॅग्रो लिमिटेड यांना देण्यात आला आहे. त्यांच्याकडूनच तब्बल154 दिवसाचा शालेय पोषण आहाराचा धान्य पुरवठा करण्यात आला होता. त्यामध्ये हे पदार्थ अडळल्याने त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्यानंत या प्रकरणाची तक्रार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडेही करण्यात आली. त्यानंतर त्यांनी याबाबतचा अहवाल माझ्याकडे आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संबंधितांवर आता कोणती कारवाई करण्यात येते याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

पालकवर्गातून चिंता आणि भिती

शाळेत येत असलेल्या पोषण आहात गुटखा, धूळ, सिमेंट आणि कचरा सापडत असेल तर हा प्रकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोकादायक आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरला असला तरी आता शिक्षण खाते याबाबत काय निर्णय घेत त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. सामाजिक कार्यकर्ते केतन तुरकर यांनी आहाराची पाहणी करुन त्याबाबतचा व्हिडिओही केला आहे. त्यामध्ये आहारात असणारी धूळ, कचरा आणि गुटख्याचे पाकिट दिसून येत आहे. त्यामुळे ही घटना समोर आल्यानंतर पालकवर्गातूनही चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

Video : ‘आई-बापावर बोलायचं नाही…’, लोकसभेत सुप्रिया सुळे संतापल्या! केंद्रीय मंत्र्यांना सुनावले खडे बोल

मिरची आता खिशालाही झोंबणार! हिरव्या मिरचीचा भाव तिप्पट वाढला, किरकोळ बाजारात किती दर?

खासगी शाळांतून पालकांना झालेल्या मारहाण प्रकरणी संचालक, बाऊन्सरवर गुन्हा दाखल करा; नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.