विजय वडेट्टीवार म्हणतात गोपीचंद पडळकर नया पंछी ज्यादा फडफड करता है…

विजय वडेट्टीवार म्हणतात गोपीचंद पडळकर नया पंछी ज्यादा फडफड करता है...
Vijay Vadettiwar, Gopichand Padalkar

मागसवर्गीय आयोगावरून पडळकरांनी डागलेल्या तोफेला विजय वडेट्टीवरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पडळकर नया नया पंछी असून नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है, असे म्हणत विजय वडेट्टीवारांनी पडळकरांचा समाचार घेतला आहे.

शाहिद पठाण

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 16, 2022 | 5:07 PM

गोंदिया : राज्यात सध्या गोपीचंद पडळकर विरुद्ध विजय वडेट्टीवार असा वाद सुरू झाला आहे. मागसवर्गीय आयोगावरून पडळकरांनी डागलेल्या तोफेला विजय वडेट्टीवरांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांच्यावर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी अगदी शेलक्या शब्दांत टीका केली. वडेट्टीवारांनी टक्केवारासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची ‘फुकटं घावलं आणि गाव सारं धावलं’, अशी अवस्था केल्याची टीका केली. शिवाय हे ओबीसी मंत्री जिथे भेटतील, तिथे त्यांना गाठा आणि जाब विचारा, असे आवाहन करायलाही ते विसरले नाहीत. त्यावर प्रत्युत्तर देताना, पडळकर नया नया पंछी असून नया नया पंछी ज्यादा फड़फड़ करता है, असे म्हणत विजय वडेट्टीवारांनी पडळकरांचा समाचार घेतला आहे.

पडळकरांची विजय वडेट्टीवरांनी खिल्ली उडवली

आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर पलटवार करत खिल्ली उडविली असून गोपीचंद पडळकर यांना ज्ञान नसल्याचे वड्डेट्टीवार बोलले आहेत. ते आज गोंदिया प्रचारसभेसाठी आल्यावर बोलत होते. ज्या मानसावर लूटमारी, फसवणूक, शेती ढापने, एट्रोसिटी सारखे गुन्हे दाखल आहेत, त्या व्यक्तिच्या वक्तव्यावर बोलने चुकीचे ठरेल असे मत ही वड्डेट्टीवार यांनी मांडले असून मागास आयोग ही स्वायंत्त संस्था असून आम्ही त्यांच्या खात्यात 5 कोटी रुपये टाकले आहेत. त्यांनी त्याचा वापर कसा करावा हे त्यांनी ठरवावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

गोपीचंद पडळकर काय म्हणाले?

छगन भुजबळांपासून विजय वडेट्टीवारापर्यंत सारेच जण ओबीसी आरक्षणावरून भाजपवर जोरदार आरोप आणि टाकाही करत आहेत. वडेट्टीवारांचा आज सांगलीमध्ये भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार समाचार घेतला. ते म्हणाले, ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार व अर्थमंत्री अजित पवार यांनी नुसती वाहवा मिळवत मागासवर्ग आयोगासाठी 450 कोटींची घोषणा केली. वास्तवात फक्त साडेचार कोटी दिले. पण ते खर्च करण्याचे आदेश ही आयोगाला मिळाले नाहीत. ना ॲाफीस ना पूर्णवेळ सचिव. आयोगाचे संशोधक सोलापुरात आणि आयोग पुण्यात. वडेट्टीवारांनी टक्केवारीसाठी ‘फुकटचं घावलं आणि गाव सारं धावलं’ अशी राज्य मागासवर्गीय आयोगाची अवस्था केल्याची टीका त्यांनी केली. त्यालाच वडेट्टीवारांनी नया पंछी म्हणत, प्रत्युत्तर दिलंय.

भाजपची सत्ता असणाऱ्या पालिकेनं परवानगी नाकारली, तरी ठाकरे मुर्दाबाद, पुतळ्यामागचे राजकारण काय?

जय भवानी जय शिवाजी! कार्यकर्त्यांसोबत खासदार नवनित राणा यांची घोषणाबाजी, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायला आम्हाला कुणाच्या परवानगीची गरज नाही’

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें