कोकणकरांसाठी आनंदाची बातमी…सिंधुदुर्ग ते रेड्डीपर्यंतच्या महामार्गास अखेर मान्यता, 10 हजार कोटींचा खर्च येणार!

कोकणकरांसाठी आनंदाची बातमी...सिंधुदुर्ग ते रेड्डीपर्यंतच्या महामार्गास अखेर मान्यता, 10 हजार कोटींचा खर्च येणार!
रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाला मान्यता मिळाली.
Image Credit source: TV9

कोकणकरांसाठी (Konkan) अत्यंत आनंदाची बातमी आहे. कोकणाच्या विकासासाठी प्रस्थापित केलेल्या रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतचा सागरी महामार्गाला (Highway)अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 21, 2022 | 11:05 AM

मुंबई : कोकणकरांसाठी (Konkan) अत्यंत आनंदाची बातमी आहे. कोकणाच्या विकासासाठी प्रस्थापित केलेल्या रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतचा सागरी महामार्गाला (Highway)अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे याचवर्षी महामार्गास मान्यता देऊन रस्ताच्या कामासाठी विकास महामंडळाकडे सोपविण्यात आला आहे. 498 किमीच्या या महामार्गाच्या बांधकामासाठी 10 हजार कोटींचा (10 thousand crores) खर्च प्रस्थापित आहे. अंतिम 16 मार्च रोजी मान्यता मिळाली असून तो चार पॅकेजमध्ये टप्प्यात बांधण्यात येणार आहे.

कोकणच्या शेतकऱ्यासाठी सोन्याचे दिवस! 

विशेष म्हणजे हा महामार्ग समुद्र किनाऱ्याजवळून जाणार आहे. यामुळे याचा फायदा येथील पर्यटनास नक्कीच होणार. या महामार्गामुळे कोकणाचा अधिक विकास देखील होणार असल्याचे बोलले जात आहे. कोकणातील प्रसिध्द आंबे, काजू, नारळ, सुपारी यांना आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार आहे. यामुळेच हा होणारा महामार्ग कोकणवायींसाठी फक्त महामार्ग नसून सोन्याचा रस्ताच आहे, असे म्हणता येईल. विशेष म्हणजे रेवस ते रेड्डी मार्गावरील केळसी खाडीवरील पुलासाठी 148 कोटी जवळपास खर्च मंजूर करण्यात आला आहे.

सागरी महामार्गाचा मुंबईकरांना देखील मोठा फायदा…

महामार्ग रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातून जाणार आहे. मात्र, मुंबईकरांना गोव्याला जाण्यासाठी या महामार्गाचा फायदा होणार आहे. हे आहेत महामार्गाचे टप्पे, द्रोणागिरी ते मुरूड 80 किलो मीटर, मुरूड ते बाणकोट 64 किलो मीटर, बाणकोट ते रत्नागिरी 146 किलो मीटर, रत्नागिरी ते पावस 20 किलो मीटर, पावस ते खाक्षीतिठा 69 किलो मीटर, खाक्षीतिठा ते मालवण 50 किलो मीटर, मालवण ते गोवा 65 किलो मीटर असणार आहेत. यादरम्यान महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी जवळपास दहा हजार कोंटीचा खर्च येणार आहे.

संबंधित बातम्या : 

Hindutva: भाजपवाले कधीपासून हिंदू झाले पाहावं लागेल, संजय राऊत यांचा खोचक टोला

गडकरींना लतादिदी आणि अटलजी यांची आठवण आली, म्हणाले मी दोनदाच हार खरेदी केला…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें