Nagpur आनंदवार्ता : बालगोपालांचे शाळेत उत्साहात स्वागत, तब्बल पावणेदोन वर्षांनंतर अनुभवली शाळा

खरबी येथील साऊथ पाइंट शाळेत विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क कंपलसरी करण्यात आलाय. वर्गात विद्यार्थ्यांना झिकझॅक पद्धतीनं बसविण्यात आलंय. विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

Nagpur आनंदवार्ता : बालगोपालांचे शाळेत उत्साहात स्वागत, तब्बल पावणेदोन वर्षांनंतर अनुभवली शाळा
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 11:56 AM

नागपूर : तब्ब्ल पावणेदोन वर्षानंतर ग्रामीण भागातल्या वर्ग एक ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळा बघीतली. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. कोरोना विषाणूच्या भीतीनं शाळा बंद होत्या. विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी आसुसले होते. ती संधी शेवटी विद्यार्थ्यांना मिळाली.

पहिल्याच दिवशी हातावर सॅनिटायझर, तोंडावर मास्क

खरबी येथील साऊथ पाइंट शाळेत विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क कंपलसरी करण्यात आलाय. वर्गात विद्यार्थ्यांना झिकझॅक पद्धतीनं बसविण्यात आलंय. विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

मोबाईलचा वापर कमी होईल

घरी असलेल्या मुलांना सांभाळणे खूप कठीण काम होते. आता ते शाळेत जाणार असल्यानं तेवढा उसंत मिळेल, असं मत एका पालकानं व्यक्त केलं. मुलं घरी होती. तेव्हा त्यांच्याकडं प्रत्येकवेळी लक्ष द्याव लागायचं. मोबाईलचा वापर आता जरा कमी होईल, अशी अपेक्षाही पालकांनी व्यक्त केली.

बहुतेक विद्यार्थ्यांची उपस्थिती

शाळेचा पहिला दिवस असल्यानं विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी फूल देऊन शाळेत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. काही शिक्षकांनी टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची चांगली उपस्थित होती.

विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

आजपासून नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या. शहरातील शाळा मात्र 10 डिसेंबरनंतरच सुरू होतील. ग्रामीण भागातील शाळा सुरू होणार असल्यानं शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये आंनदाचे वातावरण आहे. गेल्या दोन वर्षापासून शाळा बंद होत्या. ऑनलाइन शिक्षण काही शाळांमध्ये सुरू होतं. मात्र, ग्रामीण भागातील अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती नसल्याने त्यांना शिक्षण घेत येत नव्हतं. अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळं शाळा सुरू झाल्याने त्यांना शिक्षणाचे धडे गिरवता येणार आहेत. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होत असल्यानं शाळा प्रशासनाला पूर्णपणे खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात.

इतर बातम्या 

Vidarbha स्वतंत्र विदर्भाचा प्रस्तावच नाही-केंद्राचे स्पष्टीकरण, विदर्भवाद्यांनी व्यक्त केली नाराजी

Nagpur Corona धोका वाढला, लसीकरणही रेकॉर्डब्रेक, एकाच दिवशी तब्बल 76 हजार लोकांनी घेतली लस

Nagpur School Reopen गावातले चिमुकले जाणार आजपासून शाळेत, शहरातल्यांना 10 पर्यंत थांबा

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.