...म्हणूनच शरद पवारांना 'या' वयात बांधावर जावं लागतंय, गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

तर भाजपाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकरांनी पवारांवर टीकास्त्रसुद्धा सोडलं आहे.

...म्हणूनच शरद पवारांना 'या' वयात बांधावर जावं लागतंय, गोपीचंद पडळकरांचं टीकास्त्र

सांगली : परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत. वयाच्या 79व्या वर्षीसुद्धा शरद पवार नुकसानाची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत असल्यानं अनेकांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे. तर भाजपाचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकरांनी पवारांवर टीकास्त्रसुद्धा सोडलं आहे. (gopichand padalkar on sharad pawar)

शरद पवार यांना या वयात बांधावर उतरायला लागत आहे, हेच या महाआघाडीचं अपयश असल्याची टीका भाजपा नेते आणि आमदार गोपीचंद पडळकरांनी केली आहे. जे कारभारी त्यांनी या सरकारमध्ये बसवलेले आहेत, हे कारभारी सरळ सरळ अपयशी ठरले आहेत, त्यामुळे पवार साहेबांना बांधावर जाऊन पाहणी करावी लागतेय, शरद पवार हे सत्ताधारी पार्टीचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार तयार झालेले आहे. मागचा दौरादरम्यान शरद पवार साहेब हे विरोधी पक्षात होते तेव्हाचा होता. आता सत्ताधारी असतानाही त्यांना दौरे करावे लागत असल्याची टीका गोपीचंद पडळकरांनी केली आहे.

दुसरीकडे अतिवृष्टीमुळे राज्यात मोठं नुकसान झालं. अशात आपल्या बळीराजाला धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. खरं तर शरद पवार हे मराष्ट्रातल्या राजकारणातले चाणक्य आणि मोठं नाव आहे. वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही एखाद्या तरुणालाही लाजवेल, अशा पद्धतीने शरद पवार आजही काम करतात.

कोरोनाच्या संसर्गातही आपल्या जिवाची परवा न करता शरद पवार हे बळीराजाच्या भेटीसाठी जात आहेत. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. आज तुळजापूरमधून त्यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. यानंतर काकांब्रा, लोहारा, सास्तूर या गावांचा दौरा करत शरद पवार मार्गक्रमण करत आहेत. कांकाब्रा ते सास्तूरदरम्यान शरद पवार यांना तीनवेळा रस्त्यात गाडी थांबवावी लागली. या गावांना भेटी देताना शरद पवार यांनी रस्त्यात अनेक ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्यांची विचारपूस केली. याचे काही फोटो समोर आले आहेत. यावेळी पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना तुमच्या नुकसानीची नीट माहिती द्या, अशी सूचना शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केली.

नुकसान झालेल्या प्रत्येक गावात जाऊन शरद पवार शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेच. इतकंच नाही तर शरद पवार भेटून गेल्यामुळे आपल्याला मदत मिळेल, अशी आशाही शेतकरी व्यक्त करीत आहेत. शरद पवार रविवार आणि सोमवार हे दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. परतीच्या पावसामुळं झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारपुढे मर्यादा आहेत. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे.

संबंधित महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याला मर्यादा, मदतनिधीसाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार – शरद पवार

LIVE | नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी शरद पवार मराठवाडा दौऱ्यावर, मुख्यमंत्र्यांचा उद्यापासून पाहणी दौरा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *