राज्यपाल महोदय घर चांगलं आणि मोठं बनवलं आहे; एक्सचेंज करायचं काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा चिमटा

यानंतर पंतप्रधान मोदी यांनी 'क्रांती गाथा' दालनाची पाहणी केली तसेच राजभवनातील ऐतिहासिक श्रीगुंडी देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले

राज्यपाल महोदय घर चांगलं आणि मोठं बनवलं आहे; एक्सचेंज करायचं काय? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा चिमटा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 8:01 PM

मुंबई : राज्यात अनेक मुद्द्यावरून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार खंडाजंगी झाली आहे. मध्यंतरी विधानपरिषदेच्या निवडीवरून राज्यातील वाद हा वाढला होता. तर त्यानंतर अनेक वेळा राज्यपाल विरूद्ध मुख्यमंत्री असा सामना राज्याला पहायला मिळाला. मात्र आज एकाच व्यासपीठावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) एकत्र आले. तर याच व्यासपीठावर विधानपरिषदेच्या निवडणूकीनंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ही उपस्थित होते. कार्यक्रम होता नवीन ‘जल भूषण’(Jal Bhushan) इमारत आणि क्रांतिगाथा या क्रांतिकारकांच्या दालनाचा उदघाटन सोहळ्याचा. तोही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार पार पडला. यावेळी उभयंतात आज पहिल्यांदाच हास्यविनोद पहायला मिळाला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा चिमटा काढताना, राज्यपाल महोदय घर चांगलं आणि मोठं बनवलं आहे; एक्सचेंज करायचं काय? असा प्रश्न केला ज्यामुळे सभागृहात एकच हशा पिकली.

निवास्थानावरून चिमटा काढला

आज राजभवनात पार पडलेल्या कार्याक्रमात पंतप्रधान मोदी यांच्यापुढे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचला. तसेच यावेळी त्यांनी विकास महामंडळांच्या नेमणुका, सिंचन योजनांचा मुद्दा मांडत औरगंबादच्या पाणी प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला. तो प्रश्न पंतप्रधानांची सोडवावा असे आवाहनही त्यांनी केले आहे. त्यामुळे सभागृहात थोडी शांतता पसरली होती. पण जेव्हा मुख्यमंत्री मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्यपाल यांचा निवास्थानावरून चिमटा काढला ज्यामुळे सगळीकडे हास्य पसरले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यपाल यांच्या निवासस्थान ‘जल भूषण’नुतनिकरण झाले आहे. ते खुपच मोठे आणि चांगलं दिसत आहे. मग करायचं का एक्सचेंज. इतकं म्हणताच उपस्थित सगळे हसत होते. ज्यामुले वातावरणात आलेला तणाव कमी झाला.

‘क्रांती गाथा’ या दालनाचे उदघाटन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे ‘क्रांती गाथा’ या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांना समर्पित भूमिगत दालनाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते (विधान परिषद) प्रवीण दरेकर, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री आदिती तटकरे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ‘क्रांती गाथा’ दालनाची पाहणी केली तसेच राजभवनातील ऐतिहासिक श्रीगुंडी देवी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी इतिहासकार आणि लेखक डॉ विक्रम संपत यांनी पंतप्रधानांना ‘क्रांती गाथा’ दालनाची माहिती दिली.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.