तुम्ही ग्रामपंचायतचा फॉर्म भरलाय मग उचलून घ्यावा की ठेवावा? वाचा या 5 ‘टिप्स

4 जानेवारीला भरलेला फॉर्म ठेवायचा की उचलून घ्यायचा याचा निर्णय उमेदवारांना, पॅनल प्रमुखांना करायचाय.

तुम्ही ग्रामपंचायतचा फॉर्म भरलाय मग उचलून घ्यावा की ठेवावा? वाचा या 5 'टिप्स
गावागावात निवडणुकीची धामधूम
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 8:00 PM

मुंबई : राज्यभर ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडालाय. त्यात ठिकठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Grampanchayat Election Nomination Form) अर्ज दाखल केले गेलेत. त्यांची पडताळणीही पार पडलीय. जात पडताळणीचीही प्रक्रिया पार पाडलीय. 4 जानेवारीला भरलेला फॉर्म ठेवायचा की उचलून घ्यायचा याचा निर्णय उमेदवारांना, पॅनल प्रमुखांना करायचाय. पण गोंधळ होतोय, द्विधा अवस्था होतेय, निर्णय घेता येत नाही. तर मग ह्या आमच्या 5 टिप्स मदत करू शकतील (Grampanchayat Election Nomination Form).

1. डम्मी म्हणून फॉर्म भरलेला आहे?

जवळपास प्रत्येक पॅनल प्रमुखानं सर्व जागांवर काही डम्मी फॉर्म भरलेले आहेत. म्हणजेच एका मुख्य उमेदवाराचा आणि त्याच्यासोबतच एक डम्मी उमेदवार उभा केलाय. मुख्य उमेदवाराची काही तांत्रिक अडचण झाली किंवा फॉर्म भरल्यानंतर काही संबंधीत उमेदवाराला लढायची इच्छा नसेल तर मग डम्मी उमेदवारच मुख्य उमेदवार म्हणून उभा राहातो. फॉर्म भरून आता काही दिवस उलटलेत. त्यामुळे डम्मी उमेदवार म्हणून जर तुम्ही फॉर्म टाकलेला असेल तर फॉर्म काढून घ्यायला हरकत नाही. लक्षात असू द्या, पॅनलची तुम्ही कधीच पहिली पसंती नव्हता.

2. मुख्य उमेदवारापेक्षा जास्त सपोर्ट?

काही वेळा असं होतं की, एका मुख्य उमेदवाराचा फॉर्म असतो आणि सोबत डम्मीचा. फॉर्म भरल्याच्या तारखेपासून ते उचलून घेण्याच्या तारखेपर्यंत जवळपास आठवडाभराचा काळ आहे. या काळात मुख्य उमेदवाराला लढायची इच्छा होत नसेल किंवा लोकांमध्ये चर्चा, सपोर्ट हा डम्मी उमेदवाराला दिसत असेल तर मुख्य उमेदवारानं फॉर्म काढून घ्यायला हरकत नाही. डम्मी उमेदवाराला पाठिंबा मिळू शकतो.

3. अपक्षांना संधी नाही?

ग्राम पंचायतची निवडणूक ही पॅनलमधून लढवली जाते. एखादाच उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीला उभा असतो. जर निवडणुकीत मुख्य दोन किंवा त्यापेक्षा जास्त पॅनल पडलेले असतील आणि तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला असेल तर तुमची निवडुण येण्याची शक्यता धूसर आहे. कारण उमेदवार मिळत नसतानाही जिथं पॅनल प्रमुखांनी तुमचा विचार केला नसेल तर तुम्ही तुमची जागा ओळखायला हवी. त्यामुळेच फॉर्म उचलून घेऊन एखाद्या पॅनलला पाठिंबा देता येऊ शकतो.

4. राजकीय तडजोडीसाठी टाकलेला फॉर्म

गावच्या पातळीवर काही राजकारण चाललेलं असतं. काही हिशेब चुकते करायचे असतात. काही वैयक्तिक कामं ग्रामपंचायतमध्ये अडकलेले असतात. ती करून घेण्याची उत्तम संधी हिच असते. असे काही राजकीय गणित डोळ्यासमोर ठेवून तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर बातचीत करून फॉर्म काढून घ्यायला हरकत नाही (Grampanchayat Election Nomination Form).

5. वास्तव बघा, हवा डोक्यात जाऊ देऊ नका

दवंडी वाजली की कुणाच्याही अंगात स्फूरण चढतं. त्याला आखाड्यात उतरून दोन बुका ठोकून प्रतिस्पर्धी पैलवानाला अस्मान दाखवायची खुमखुमी चढते. ग्रामपंचायतची निवडणूकही त्याला अपवाद नाही. पण आपण फॉर्म तर टाकलाय पण प्रत्यक्ष लढाईत मात्र आताच आपली दमछाक होताना दिसत असेल तर डोक्यात गेलेली हवा काढा आणि काही राजकीय तडतोड करत मैदानातून बाहेर पडा. सिंहसुद्धा शिकारीसाठी एक पाऊल मागे घेऊन झेप घेत असतो. इथंही तयारी झाल्यानंतरच संधी घ्या. टाकलेला फॉर्म काढून घ्या.

Grampanchayat Election Nomination Form

संबंधित बातम्या :

ग्रामपंचायतची इलेक्शन, पक्षांची किती तयारी?

राजकारणाचा अजब डाव : हर्षवर्धन जाधव Vs पत्नी संजना जाधव Vs मुलगा आदित्य जाधव

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.