नातीच्या बर्थडेला आजीकडून किडनी गिफ्ट

आजच्या युगात पैशांसाठी अगदी रक्ताच्या नात्यांनाही तिलांजली देणारे अनेकजण पाहायला मिळतात. मात्र, नाशिकमध्ये एका 65 वर्षीय आजींनी आपल्या नातीला एक आगळं-वेगळं बर्थडे गिफ्ट दिलं आहे. नाशिकमध्ये सध्या सर्वत्र याचीच चर्चा आहे.

नातीच्या बर्थडेला आजीकडून किडनी गिफ्ट

नाशिक : आजच्या युगात पैशांसाठी अगदी रक्ताच्या नात्यांनाही तिलांजली देणारे अनेकजण पाहायला मिळतात. मात्र, नाशिकमध्ये एका 65 वर्षीय आजींनी आपल्या नातीला स्वतःची किडनी देत जीवनदान दिलं आहे. विशेष म्हणजे या नातीच्या किडनी प्रत्यारोपणाची (Kidney Transplant) शस्त्रक्रिया तिच्या जन्मदिनाच्या दिवशीच यशस्वी झाली. त्यामुळे आजीनं आपल्या नातीला दिलेल्या या आगळ्या-वेगळ्या बर्थडे (Unique Birthday Gift) गिफ्टची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

आजीबाईंनी अनोखं बर्थडे गिफ्ट दिलेल्या नातीचं नाव संजना हिरे असं आहे. तिच्या दोन्ही किडनी निकामी झाल्या होत्या. त्यामुळे तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, घरातील कोणाचीही किडनी संजनासाठी पात्र ठरली नाही. त्यामुळे घरातील प्रत्येकाच्या मनात संजनाला गमावण्याची भिती होती. अशावेळी या आजीबाईंनी समोर येत माझी किडनी चालते का बघा? असं म्हटलं.

‘नातीला जीवनदान देता आल्यानं मी भाग्यवान’

आजीबाईंचं वय पाहता त्यांची किडनी पात्र ठरणार नाही, असाच सर्वांचा कयास होता. मात्र, डॉक्टरांनी सर्व वैद्यकीय तपासणी केल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. आजींची किडनी नात संजनासाठी योग्य असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे अखरे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून संजनाला अक्षरशः जीवनदानच मिळालं आहे. नातीला जीवनदान देता आलं याचं यासाठी मी भाग्यवान असल्याचं म्हणत आजी मिराबाई हिरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

दुसरीकडे आयुष्याच्या सुरुवातीलाच असताना आलेलं हे संकट टळल्यानं संजनालाही आनंदी आहे. आजीनं मला आयुष्यभर लक्षात राहिलं असं बर्थडे गिफ्ट दिल्याची भावना संजनाच्या डोळ्यात पाहायला मिळाली.

आजीबाईंची इच्छाशक्ती आणि प्रतिकारशक्ती बघून डॉक्टरही चकित

आजीबाईंची इच्छाशक्ती आणि प्रतिकारशक्ती बघून शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर देखील चकित झाले. पुर्वीच्या लोकांचा शुद्ध आहार, शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा यामुळेच या वयात देखील आजीबाई आपल्या नातीचा प्राण वाचवू शकल्या, असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं. संजनाच्या आजारानं बेचैन झालेल्या तिच्या आई-वडिलांना तर नेमकं काय बोलावं हेच कळत नाही. एकीकडे आपल्या मुलीला जीवदान मिळाल्याचा आनंद, तर दुसरीकडे स्वतःच्या आईच्या दातृत्वानं मुलीचे वडिल विजय हिरे अगदी गहिवरले.

आजच्या युगात जिथं सख्खा भाऊ भावाला मदत करत नाही, मुलगा आईचा नाही आणि पैशांसाठी रक्ताच्या नात्यांना कोर्टात खेचण्याची अनेक उदाहरणे समोर येतात. अशावेळी मिराबाईंसारख्या उदाहरणांनी नाते आणि माणूसकी शाबूत असल्याचेच पाहायला मिळते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *