इतर जिल्ह्यांपेक्षा यवतमाळ जिल्ह्याची कामगिरी चांगलीच, पालकमंत्र्यांकडून डॉक्टरांसह यंत्रणेचे कौतुक

जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला केलं. (Minister Sanjay Rathod On Yavatmal Doctor strike) 

इतर जिल्ह्यांपेक्षा यवतमाळ जिल्ह्याची कामगिरी चांगलीच, पालकमंत्र्यांकडून डॉक्टरांसह यंत्रणेचे कौतुक
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 7:48 AM

यवतमाळ : कोरोनाचे संकट हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे डॉक्टरांची सेवा नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आहे. त्या पार्श्वभूमीवर जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. यवतमाळमध्ये गेल्या 3-4 दिवसांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेऊन त्यांनी शिष्टमंडळाची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. (Minister Sanjay Rathod On Yavatmal Doctor strike)

कोरोनाच्या संकटात शासन-प्रशासन तसेच गावपातळीवरील सर्व यंत्रणा अतिशय जोमाने लढत आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत जनतेच्या‍ हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे सर्वांची एकजूट असणे आवश्यक आहे. प्रशासन आणि आरोग्य विभागामध्ये समेट घडवून आणण्याचा आपला प्रयत्न आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत. त्यापैकी बहुतांश मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. केवळ जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीवर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ठाम न राहता जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाला केलं.

जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, संपूर्ण यंत्रणा तसेच ग्रामपातळीवरील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका इत्यादींच्या अथक प्रयत्नामुळेच सुरुवातीला यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा एकही मृत्यू नव्हता. सर्वांच्या प्रयत्नाने जिल्हा नियंत्रणात होता. आताही इतर जिल्ह्यांपेक्षा यवतमाळ जिल्ह्याची कामगिरी चांगलीच आहे. याचे संपूर्ण श्रेय येथील सर्व यंत्रणांना जाते, असेही संजय राठोड म्हणाले.

‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही जनमोहीम करण्यासाठी सर्वजण प्रयत्नशील आहे. त्यासाठी सर्वांची एकजूट असावी. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बैठका यापुढे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात घेण्यासाठीही नियोजन करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील परिस्थितीबाबत मुख्यमंत्री यांना सांगण्यात आले असून विभागीय आयुक्तांनीसुध्दा डॉक्टरांचे म्हणणे ऐकून घेतले आहे.

संपूर्ण यंत्रणा युध्दजन्य परिस्थतीसारखी कोरोनाचा सामना करीत आहे. त्यासाठी काही मतभेद झाले असतील तर ते नक्कीच सोडविण्यास येतील. मात्र नागरिकांचा विचार करून डॉक्टरांनी आपली सेवा बजावावी, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.(Minister Sanjay Rathod On Yavatmal Doctor strike)

संबंधित बातम्या : 

पार्थ आतला आवाज ऐकतात, त्यांचा प्रवास ‘सत्यमेव जयते’च्या दिशने : चंद्रकांत पाटील

सप्टेंबरमधील संसर्गाचा दर सर्वाधिक, आता तरी कोरोना चाचण्या वाढवा; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.